बांगलादेशमधील दंगलीचे प्रकरण
ढाका : एका हिंदूने फेसबूकवरून इस्लामची निंदा केल्याचा खोटा आरोप करत १० नोव्हेंबर या दिवशी बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा या गावात २० सहस्र धर्मांधांच्या जमावाने हिंदूंची ३० पेक्षा अधिक घरे आणि दुकाने जाळून टाकली होती. या प्रकरणी पोलिसांनी टीटू रॉय या हिंदूस अटक केली होती. त्याला न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीचा कालावधी शनिवार, १८ नोव्हेंबरला संपला. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले होते; मात्र बांगलादेशमध्ये शनिवारी सुट्टी असल्याने तेथे न्यायाधीश अथवा अधिवक्ते उपस्थित नव्हते. त्यामुळे टीटू रॉय याला जामीन अर्ज दाखल करता आला नाही. दुसर्या दिवशी न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीची मुदत ५ दिवसांनी वाढवली. या प्रकरणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी प्रयत्न करूनही काहीच लाभ झाला नाही. टीटू रॉय याला न्याय मिळावा, यासाठी ७ अधिवक्ते सिद्ध होते; मात्र शनिवारची सुट्टी असल्याने कुणीही उपस्थित राहू शकले नाही. यावरून बांगलादेशमध्ये न्यायालयीन यंत्रणाही हिंदूंना भेदभावाची वागणूक देते, हेच यावरून लक्षात येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात