फलटण (जिल्हा सातारा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
फलटण (जिल्हा सातारा) : कथित प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी ताजमहाल ही वास्तू मुसलमानांची नसून हिंदूंची आहे. ही वास्तू ताजमहाल नामक मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, याविषयीचा सत्य इतिहास समोर येण्यासाठी शासनाने त्वरित इतिहासतज्ञांची समिती नेमावी, तिचा अहवाल मागवावा. जोपर्यंत ती हिंदु वास्तू आहे कि इस्लामी थडगे, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत तेथे चालू असलेले नमाजपठण बंद करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुधा घाटगे यांनी केली. येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात त्या बोलत होत्या. या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आमचे सहकार्य असेल ! – संदीप जाधव, अध्यक्ष शहर युवा भाजप
कोणताही लढा रक्तरंजित नव्हे, तर वैचारिक स्तरावर असावा. हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. माझे, तसेच माझ्या पक्षाचे समितीच्या कार्याला नेहमीच सहकार्य असेल.
सध्या केंद्रात भाजपचे सरकार असल्याने हिंदु नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – जोतीराम गोरे, भाजप
आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.
विशेष घटना
साध्या वेशातील पोलिसांनी आंदोलनाचे छायाचित्र काढले. वाहतूक नियंत्रक (ट्रॅफिक पोलीस) महिला पोलिसानेही आंदोलनाचे छायाचित्र काढून आंदोलनासाठी अनुमती घेतली आहे का, असे विचारले. (पोलिसांची अनुमती मिळाल्यानंतरच हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलनाचे आयोजन केले जाते. अनुमतीची विचारणा केली जाणे हे पोलीस प्रशासनातील समन्वयाचा अभावच दर्शवते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात