हिंदूंनो, भगवा ध्वज उभारण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावरून हिंदु राष्ट्राची स्थापना किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते !
संभाजीनगर : येथील शेंदुरवादा या गावातील बाजारपेठ भागातील भवानीमातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर येथील हिंदु युवकांनी १८ फेब्रुवारी या दिवशी उभारलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढून टाकला होता; मात्र शिवसैनिक आणि स्थानिक हिंदु युवक यांनी संघर्ष करून १९ फेब्रुवारी या दिवशी तो परत उभारला.
१. मंदिरासमोरील जागेत भगवा ध्वज उभारलेला पाहून मुसलमानांनी पोलिसांत तक्रार केली.
२. सकाळी ११ वाजता पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी हिंदु अन् मुसलमान यांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
३. त्यानंतर पोलिसांनी ते स्थळ अतिक्रमित ठरवून ध्वज काढून टाकला.
४. पोलिसांनी ध्वज लावण्यास अनुमती नाकारल्याने हिंदू संतप्त झाले. त्यानंतर ध्वज त्याच ठिकाणी लावला जाईल, अशी ठाम भूमिका युवकांनी घेतली.
५. त्यावर पोलिसांनी ४५ हिंदु युवकांना कह्यात घेतले.
६. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना या संदर्भात माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांसमवेत मध्यस्ती केली आणि या तरुणांना सोडवून आणले, तसेच हिंदु युवकांवर विनाकारण गुन्हा दाखल न करण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितले. (हिंदूंच्या पाठीशी शिवसेना नेहमीच ठामपणे उभी रहाते; म्हणून शिवसेनेचा हिंदूंना आधार वाटतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
७. १९ फेब्रुवारीला श्री. दानवे यांनी हिंदु युवकांसमवेत भगवा ध्वज उभारण्याचे नियोजन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात