१. डोंबिवली (पूर्व) येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन !
डोंबिवली (पूर्व) येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी एक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यानंतर सहभागींनी प्रथमोपचार उपक्रम, महाविद्यालयांत विषय मांडण्यासाठी अनुमती मिळवणे, धर्मशिक्षणवर्ग घेणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
२. रांगोळीच्या माध्यमातून धर्मप्रसार करणारे भिवंडी येथील धर्मप्रेमी राजू मोने !
धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्मप्रेमी श्री. राजू मोने यांनी दिवाळीच्या वेळी घराबाहेर एकच लक्ष्य हिंदु राष्ट्र, तसेच लव्ह जिहाद यांसारख्या विषयांवर रांगोळी काढली होती. हा विषय अनेक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी या रांगोळीची छायाचित्रे काढली आणि फेसबूक, तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमांतून ती अनेकांपर्यंत पोहोचवली.
३. उत्तरशीव, डोंबिवली (ग्रामीण) येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठकीचे आयोजन !
उत्तरशीव, डोंबिवली (ग्रामीण) या भागात हिंदुत्वनिष्ठांसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री. गिरीश पाटील, श्री. आकाश पाटील आदी धर्मप्रेमींनी बैठक आयोजित करण्यात पुढाकार घेतला. या वेळी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. उपस्थितांना समितीच्या कार्याची ओळख, हिंदु धर्मावर होत असलेले आघात आणि ते रोखण्यासाठी एकत्र येणे का आवश्यक आहे ?, यांविषयी माहिती देण्यात आली.
– श्री. बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, ठाणे आणि रायगड. (ऑक्टोबर २०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात