Menu Close

रशियामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍यांवर धर्मांध ख्रिस्ती संघटनांचे आक्रमण

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना साहाय्य करण्याचे आवाहन

  • रशियातील ख्रिस्ती भारतातील गोव्यात येऊन अमली पदार्थांची तस्करी करतात, एकेक गाव कह्यात घेतात, अनैतिक गोष्टी करतात, रशियाचे झेंडे लावतात, तरीही भारतीय शासनकर्ते आणि जनता मौन बाळगते; मात्र हिंदूंनी रशियामध्ये धर्माचे कार्य केले, तर त्याला विरोध केला जातो, हिंदूंचा धर्मग्रंथ असलेली भगवद्गीता जाळली जाते !
  • भारतात ख्रिस्ती मिशनरी येतात आणि हिंदूंचे धर्मांतर करतात, काही राज्ये ख्रिस्तीबहुल बनवतात, तरी हिंदू काहीच करत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मॉस्को : रशियामध्ये राहून हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे श्री. प्रकाश यांच्यावर ख्रिस्ती धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडल्याचे वृत्त ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. रशियातील एक धर्मांध संघटना हिंदु धर्म आणि भारतीय यांना विरोध करत आहे. श्री. प्रकाश गेल्या २७ वर्षांपासून रशियामध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. धमकावण्याच्या घटनेनंतर श्री. प्रकाश यांनी यूट्यूबवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

१. काही दिवसांपूर्वी श्री. प्रकाश यांना या धर्मांध संघटनेने ‘रशिया केवळ ख्रिस्त्यांचा देश आहे. येथे हिंदु धर्म चालणार नाही,’ असे धमकावले. तसेच श्री. प्रकाश यांनी बांधलेल्या आश्रमामध्ये बळजोरीने घुसून तेथील लोकांना धमकावले जात आहे.

२. श्री. प्रकाश म्हणाले, ‘‘अ‍ॅलेक्झांडर डोर्व्किन नावाची व्यक्ती यांना हिंदु धर्माला रशियातून बाहेर नेण्याची धमकी देतेे. २ नोव्हेंबरला काही जण पोलिसांच्या गणवेशात आश्रमात घुसले आणि त्यांनी खोटी धाड घातली. यानंतर मी माझ्या मुलासहित पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलो असता काही जणांनी मला धमकावले आणि मारहाण केली. अ‍ॅलेक्सझेंडर येथील लोकांना हिंदु धर्माच्या विरोधात भडकवत आहे. त्याने काही संघटनाही बनवल्या आहेत आणि त्या हिंदूंना धमकावत असतात.’’

३. श्री. प्रकाश यांनी म्हटले की, या आक्रमणांमुळे येथील हिंदू भयग्रस्त आहेत. जर अशी आक्रमणे रोकण्यात आली नाहीत, तर त्याचा परिणाम रशिया आणि भारत यांच्या संबंधांवर होऊ शकतो.

४. या घटनांच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदल प्रमुख व्ही.के. सिंह यांची श्री. प्रकाश यांनी भेट घेतली होती; मात्र अद्याप कोणतेही साहाय्य मिळालेले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *