Menu Close

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या शिक्षक संघटनेने काढलेल्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग

याला तृणमूल काँग्रेस आणि तिच्या शिक्षक संघटनेचा भारतद्वेष समजायचे का ? अशा संघटनेतील शिक्षक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? तृणमूल काँग्रेसच्या अशा संघटनेवर बंदीच घातली पाहिजे आणि उत्तरदायींना कारागृहात पाठवले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : बंगालच्या टीएम्सी (तृणमूल काँग्रेस) टीचर्स असोसिएशनने परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीर हा पाकिस्तानचा आणि अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवला आहे, असे भाजपने म्हटले आहे. ही प्रश्‍नपत्रिका इयत्ता १० वीची आहे. संबंधित प्रश्‍नपत्रिका बंगाल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनकडून काढण्यात आली आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.

भाजपचे राहुल सिन्हा म्हणाले की, तृणमूल काँग्रेसला नेमके काय हवे आहे ? त्यांना देशाची फाळणी करायची आहे का ? जे सैनिक काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथे देशवासियांच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावत आहेत, हा त्यांचा अपमान आहे. या चुकीसाठी शिक्षणमंत्र्यांना पदावरून तातडीने हटवण्यात यावे आणि तृणमूल काँग्रेसने  क्षमा मागवी.

बंगालमधील भाजपचे सरचिटणीस राजू बॅनर्जी यांनी सांगितले की, या प्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *