नवी देहली : ग्लोबल सोसायटी इंडिया, फेथ फाऊंडेशनच्या वतीने येथील कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी जीवनातील साधनेचे महत्त्व याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्यांनी साधना, तणावमुक्त जीवनासाठी नामजप, स्वभावदोष निर्मूलन, मन कसे कार्य करते ? साधनेने मनावरील अयोग्य संस्कार नष्ट करून आपण आनंदप्राप्ती कशी करू शकतो ? याविषयी विवेचन केले. या मार्गदर्शनाला फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन फेथ फाऊंडेशनचे कर्नल श्री. अशोक किणी आणि श्रीमती मोनिका भट्ट यांनी केले होते.
क्षणचित्रे
१. सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेले आध्यात्मिक संशोधन जाणून घेतल्यानंतर उपस्थितांमध्ये हिंदु धर्माविषयी श्रद्धा अधिक वृद्धींगत झाली.
२. हिंदु धर्माची महानता वैज्ञानिक उपकरणांद्वारेही सिद्ध होत आहे, हे समजल्यावर उपस्थितांना अतिशय आनंद झाला.
३. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शंकानिरसनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
४. या कार्यक्रमात द मोन्क व्हू बिकेम चिफ मिनिस्टर या इंग्रजी पुस्तकाचे लेखक आणि ग्लोबल सोसायटी इंडियाचे सदस्य श्री. शांतनु गुप्ता उपस्थित होते. त्यांचा सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकाविषयी उपस्थितांना माहिती दिली.
५. मोनिका भट्ट या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथे झालेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन त्यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात