मंगळुरू (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय वार्ताहर प्रशिक्षण शिबीर
मंगळुरू : येथील सनातन सेवाकेंद्रात २५ आणि २६ नोव्हेंबर या कालावधीत दोन दिवसीय कर्नाटक राज्यस्तरीय वार्ताहर प्रशिक्षण शिबीर पार पडले. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रसारासाठी वार्ताहर सेवा आणि प्रसिद्धी सेवा कशी करावी, यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या शिबिरात देण्यात आले. छायाचित्रांतील बारकावे कसे टिपायचे, वार्ताहर सेवा करण्यासाठी आवश्यक गुण, शुद्धलेखन आणि व्याकरण यांचे महत्त्व आदी विषयांवर दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधी कु. सायली डिंगरे आणि कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रशांत हरिहर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. प्रसिद्धीच्या सेवेतील तांत्रिक सूत्रांविषयी हिंदु जनजागृती समितीचे बागलकोट जिल्हा समन्वयक श्री. संतोष भटकळकर आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. केशव गौडा यांनी मार्गदर्शन केले. राज्यातील २० शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेला संदेश दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या जिल्हासेविका सौ. मंजुळा गौडा यांनी वाचून दाखवला. शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले, आपल्याला वार्ताहर आणि प्रसिद्धी या सेवांच्या माध्यमातून राष्ट्र अन् धर्म यांचे विचार प्रत्येक हिंदूच्या घरोघरी पोहोचवायचे आहेत.
कु. सायली डिंगरे म्हणाल्या, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या सनातन प्रभात नियतकालिकांसाठी वृत्तसंकलन करणे, ही राष्ट्र आणि धर्म यांची सेवाच आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे वैचारिक युद्ध लढणे हे सनातन प्रभातच्या वार्ताहराचे दायित्व आहे. त्याचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घ्या.
श्री. प्रशांत हरिहर म्हणाले की, आदर्श नियतकालिक असलेल्या सनातन प्रभातच्या माध्यमातून समाज, राष्ट्र आणि धर्म जागृती करणारे आदर्श वार्ताहर बनूया.
प्रसारमाध्यमांद्वारे व्यापक धर्मप्रसार होऊ शकतो, याची जाणीव नव्हती. शिबिरामुळे या कार्याची व्याप्ती लक्षात येऊन उत्साह वाढला आहे. समाजात पसरत असलेल्या दुष्प्रवृतींविरुद्ध वार्ताहर सेवेच्या माध्यमातून समाजात जागृती कशी करायची, याची जाणीव झाली, असे मनोगत सांगताप्रसंगी शिबिरार्थींनी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात