Menu Close

हिंदूंनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प करावा ! – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

लिंब (जिल्हा सातारा) येथे शिवप्रतापदिन उत्साहात !

लिंब (जिल्हा सातारा) : हिंदूंवर वाढता अन्याय पहाता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्य कोठेही दिसत नाही. लव्ह जिहाद आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे हिंदूंची घसरण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी शिवपराक्रमाचे स्मरण करत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले. लिंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवप्रतापदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शिवभूषण श्री. रोहिदास हांडे यांनी इतिहासातील घटना आणि शिवाजी महाराजांचे अफझलखानविरुद्धचे युद्ध कथन केले. त्यांनी शिवप्रेमींना आवाहन केले की, शिवप्रतापदिनी छत्रपती शिवरायांचे स्मरण करून त्यांचे गुण आत्मसात करणे, हीच छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल.

सकाळी श्री. संदीप पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. शिवरायांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

क्षणचित्र

कार्यक्रमाला साध्या वेशातील, तसेच गणवेशधारी पोलीस आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *