हिंदूंच्या देवतांचा सातत्याने अवमान होत असतांना केंद्रातील भाजप सरकारने याविरोधात कठोर कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
थिरुवनंतपुरम् : केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या फेसबूक खात्याच्या प्रमुखाने आक्षेपार्ह चित्र काढण्यास नकार दिला आहे. हे चित्र केवळ मनोरंजनासाठी पोस्ट करण्यात आले आहे. यातून कोणाचीही हानी केलेली नाही, असे त्याने म्हटले आहे. (मनोरंजन करण्यासाठी हिंदूंचेच देव कसे सापडतात ? अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा वापर केल्यास परिणाम काय होतो, हे त्यांना माहिती असल्यानेच ते सहिष्णु हिंदूंच्या भावना दुखावतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या चित्रात भगवान अयप्पा शेजआरतीची वाटत आहेत, कारण ती झाल्यावर मंदिराचे द्वार बंद होऊन त्यांना झोपायला मिळेल, असे त्यांना वाटत आहे, असे दर्शवण्यात आले आहे. या चित्राला आयसीयू (इंटरनॅशनल चालू युनियन) या फेसबूक खात्यानेही शेअर केले आहे. (हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करणार्या फेसबूक पानावर बंदी घालणारे केंद्र सरकार अशा पानांवर बंदी का घालत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात