श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची वाहनफेरीद्वारे मागणी
सातारा : संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी सारख्या इस्लामी आक्रमकाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. राणी पद्मावती यांची अपकीर्ती करण्यासाठी त्यांचे तथाकथित प्रेमप्रकरण दाखवले आहे. हा केवळ राजपूतच नव्हे; तर समस्त हिंदूंचा अवमान आहे. त्यामुळे पद्मावती चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित होऊ देऊ नये, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटन यांच्या वतीने वाहनफेरी काढून जागृती करण्यात आली. यानंतर उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘न्यायालयाचे निर्देश डावलून सकाळी ६ वाजण्याआधी मशिदींचे भोंगे वाजत असतात’, यासंबंधी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे हिंदुत्वनिष्ठांनी सूत्र उपस्थित केले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी तत्परतेने संबंधित विभागास आदेश देऊन सर्व मौलानांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते निर्देश देण्यास सांगितले. (हिंदुत्वनिष्ठांनी सांगितल्यावर कृती करण्यापेक्षा अवैध कृत्यांवर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात