बांगलादेश इस्लामी कट्टरवादाच्या विळख्यात !
किती ख्रिस्ती संघटना हिंदूंवरील अत्याचारांविषयी आवाज उठवतात ?
ढाका : बांगलादेशच्या नाटोर जिल्ह्यात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायाचे धर्मगुरु वॉल्टर विलियम रूझारिओ (वय ४२ वर्षे) यांचे काही धर्मांधांनी २९ नोव्हेंबरला अपहरण केले. ते जोनेल येथील सेंट लुईस हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. धर्मगुरु रूझारिओ यांच्या कुटुंबियांकडून धर्मांधांनी खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. धर्मगुरु रूझारिओ यांचे अपहरण झाल्याचे कळताच बोरेग्राम पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
ख्रिस्ती धर्मगुरूंच्या अपहरणाविषयी माहिती मिळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बोरेग्राम पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधून चौकशीची मागणी केली. अधिवक्ता घोष यांनी नाटोर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बिपलाब बिजॉय तालुकदार यांच्याशीही संपर्क साधला. ‘ख्रिस्ती धर्मगुरूंची तातडीने सुटका करावी आणि आरोपींना अटक करावी’, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात