गदग (कर्नाटक) येथे जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन
गदग (कर्नाटक) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा दिला. त्याचप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत झाले पाहिजे. यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे गुरुप्रसाद गौडा यांनी येथील जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनात काढले.
गदग जिल्ह्यातील लक्ष्मीश्वर येथील बी.सी.एन्. महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच २ दिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्रीराम सेनेचे श्री. गंगाधर कुलकर्णी, तसेच धर्माभिमानी श्री. गिरीश आगडी उपस्थित होते.
हिंदु धर्माला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. या समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होय, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी केले. हिंदू अधिवेशनाच्या समारोप समारंभात रामकृष्ण आश्रमाच्या माता तेजोमयी उपस्थित होत्या. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी गुरूंनी सांगितलेल्या मार्गानुसार साधना केली पाहिजे, असे त्यांनी या वेळी सांगितले. या हिंदू अधिवेशनास अधिवक्ता मलेशप्पा ब्याडगी यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात