Menu Close

हिंदूंना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात अंधेरी (मुंबई) येथील हिंदु धर्मजागृती सभेत धर्मप्रेमींची एकजूट !

अंधेरी : कायद्याचे पालन करणार्‍या हिंदूंना प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा दाखवला जातो आणि कायदा मोडणार्‍या अन्य धर्मियांना नेहमीच सवलत दिली जाते. हे म्हणजे हिंदूंना कायदा आणि अन्य धर्मियांना लाभ असेच झाले. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. समितीच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी क्रांतीवीर लहुजी साळवेनगर येथील मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला बहुसंख्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. मारूती सूर्यवंशी यांनी सभेसाठी जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली. तसेच धर्माभिमानी श्री. वसंत दहिफळे यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून देऊन प्रचारकार्यातही सहभाग घेतला. सभेनंतर धर्मप्रेमींनी त्यांच्या परिसरात धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली. (धर्मकार्यात आपापल्या परीने सहभागी होणार्‍या हिंदू बांधवांचे अभिनंदन ! समस्त हिंदूंनी यातून आदर्श घेऊन नियमित धर्मकार्यासाठी वेळ द्यावा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी साधनेचे बळ प्राप्त करावे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

सौ. नयना भगत

हिंदूंनी कुलदेवता आणि दत्त यांचा नियमित जप करावा. केवळ ऐहिक सुखाच्या मागे न लागता साधना करून शाश्‍वत आनंद प्राप्त करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुलदेवतेची उपासना करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी साधनेचे बळ प्राप्त करावे.

धर्मप्रेमी म्हणाले….

१. श्री. मारुती सूर्यवंशी, वाचक, साप्ताहिक सनातन प्रभात : सभेच्या माध्यमातून मला समितीच्या धर्मकार्यात सहभागी होता आले, याचा मला आनंद आहे.

२. श्री. देवराव शिंदे (वय ९० वर्षे) : हिंदु धर्मावरील आघात पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. समितीचे या विरोधातील कार्य आवडले.

३. एक धर्मप्रेमी महिला : आमच्या विभागात धर्मसभा घेऊन आम्हाला धर्म आणि राष्ट्र यांसंबंधी अनेक महत्त्वपूर्ण माहिती करून दिल्याविषयी समितीचे आभार !

४. भाजपचा एक कार्यकर्ता : समितीचे धर्मजागृतीचे कार्य प्रशंसनीय आहे. या कार्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.

पुढील कार्यासाठी एकत्रित येणार !

पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी ५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सभेच्या ठिकाणीच धर्मप्रेमींनी एकत्रित येण्याचे ठरवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *