Menu Close

कोलकाता येथील कारागृहात इसिसचा आतंकवादी मुसाकडून सुरक्षारक्षकाचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

अशा आतंकवाद्यांना कारागृहात ठेवून पोसण्यापेक्षा त्यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना फासावर लटकवले का जात नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

महंमद मोसीउद्दीन उपाख्य अबू मुसा

कोलकाता : गेल्या वर्षी बंगालमधून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी महंमद मोसीउद्दीन उपाख्य अबू मुसा याने ३ डिसेंबरला सकाळी कोलकात्याच्या अलीपूर मध्यवर्ती कारागृहात एका सुरक्षारक्षकाचा चाकूने शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या सुरक्षारक्षकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मुसाकडे चाकू कुठून आला याचा शोध घेण्यात येत आहे, असे कारागृहमंत्री उज्ज्वल विश्‍वास यांनी सांगितले.

मुसा याच्यावर कारागृहातच खटला चालवण्यात येत आहे. ३ डिसेंबरला त्याला  येथील न्यायालयात नेण्यासाठी त्याच्या खोलीचे दार गोविंद चंद्र डे या सुरक्षारक्षकाने उघडल्यावर मुसाने हे आक्रमण केले. या वेळी अन्य कैदी आणि सुरक्षारक्षक यांनी डे यांना सोडवून मुसाला पकडले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *