Menu Close

केरळमधील अर्धनारीनटेश्‍वर मंदिरात लाल झेंडा आणि घोषणा रंगवून मार्क्सवादी गुंडांनी विटंबना केली

निधर्मी देशातील हिंदूंवर आक्रमणे करणारा सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष !

  • देशात पुरोगाम्यांवर किंवा अल्पसंख्यांकांवर कथित आक्रमण झाल्यावर थेट केंद्र सरकारला उत्तरदायी ठरवणारे निधर्मीवादी केरळमधील माकपच्या गुंडगिरीवर मात्र सोयीस्कर मौन बाळगतात ! त्यांना ही असहिष्णुता दिसत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

कोची : दक्षिण केरळ भागातील तमिळनाडू सीमेजवळ असलेल्या परस्साला येथील अतिप्राचीन काळातील अर्धनारीनटेश्‍वर मंदिरात सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गुडांनी त्यांच्या पक्षाचे लाल झेंडे लावले, तसेच विविध रंग वापरून पक्षाच्या घोषणा रंगवल्या. यामुळे मंदिराची पवित्रता भंग होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

केरळ राज्यात मार्क्सवादी पक्षाचे सरकार आल्यापासून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या हे नेहमीचेच झाले आहे. तसेच हिंदूंच्या मंदिरांवर पक्षाचे लाल झेंडे लावणे, कमानी उभ्या करणे, मंदिराच्या परिसरात मांसाहाराची दुकाने थाटणे असे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करून काही परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण सत्ताधारी पक्षाचा प्रशासकीय यंत्रणावर सतत दबाव असतो, असे येथील हिंदूंकडून म्हटले जात आहे. (काश्मीर असो कि केरळ केंद्रातील भाजप सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी काहीच करत नाही, असेच आता हिंदूंना वाटू लागले आहे, हे त्याने लक्षात घ्यायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *