शिवरायांचा तेजस्वी इतिहास हिंदूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
मुंबई : गोवंडी देवनार येथील स्वयंभू हनुमान मंदिरात २६ नोव्हेंबर या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हा उत्सव पार पडला. या वेळी अफझलखानवधासह शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास व्याख्यानातून मांडण्यात आला. या कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. या वेळी शिवपुत्र युवा प्रतिष्ठानचे श्री. विक्रांत काकडे यांनी शिवप्रतापदिनाच्या ऐतिहासिक विषयाचे महत्त्व सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर औटी यांनी शिवरांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात