Menu Close

धर्मकार्यासाठी आठवड्यातून एकदा एकत्रित येण्याचा नवीन पनवेल येथील धर्मप्रेमींचा निश्‍चय !

नवीन पनवेल : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येथील सेक्टर १८ मधील श्रीराम जलाराम मंदिरात १ डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रत्येक आठवड्यात धर्मकार्यासाठी एकत्र येण्याचे धर्मप्रेमींनी ठरवले. बैठकीला सेक्टर ९ मधील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. दत्तात्रय पाटील, श्री. दिलीप नेरूरकर, डॉ. अनिल चिटणीस, श्री. परमेश्‍वरन्, श्री. किरण सावंत, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी श्री. नरेंद्र सुर्वे यांनी समितीच्या कार्याचा आढावा, समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो, याविषयी माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *