यवतमाळ : येथील काकडदाती (पुसद) आणि धानोरा (कारंजा) या गावांत हिंदु धर्मजागृती सभा पार पडल्या. ‘प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना केले. रणरागिणी शाखेच्या कु. माधवी चोरे यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. दोन्ही सभांना ३०० ते ३५० धर्माभिमानी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. सभेच्या प्रसारासह सर्व सिद्धता गावातील धर्मप्रेमींनी केली.
२. सभेनंतरच्या आढावा बैठकीत ४० जणांमध्ये २५ मुलींचा सहभाग होता. सर्वांनी धर्मशिक्षण वर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग यांची मागणी केली.
३. ह.भ.प. भरत महाराज घोगरे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात