कुडुमाळूर (केरळ) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वर्ग घेण्यात आला. या वर्गाचा ५५ विद्यार्थी आणि पालक यांनी लाभ घेतला. या वर्गाचे आयोजन मानव सेवा समितीने केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रणिता सुखटणकर या म्हणाल्या की, आज तरुणांचे मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव, एकाग्रता नसणे, निराशा आदी समस्या दिसून येतात. यावर मात करण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक आहे. या वेळी एका पालकाने सांगितले, अनेक वेळा समुपदेशन सत्रात एक व्यक्ती उपस्थितांना अनेक सल्ले देत असल्याचे आढळून येते. हे सत्र मात्र अतिशय वेगळे होते. येथे मुलांना त्यांचे प्रश्न समजून घेता आले, तसेच ते कसे सोडवू शकतो, हेही शिकता आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात