Menu Close

कोलोन (जर्मनी) येथील शेकडो महिलांच्या लैंगिक छळांसाठी मुसलमान देशांतील शरणार्थी उत्तरदायी !

कोलोन (जर्मनी) : जर्मनीच्या कोलोन शहरात गेल्या ३१ डिसेंबरच्या रात्री शेकडो जर्मन महिलांचा लैंगिक छळ करण्यामागे जर्मनीचा आश्रय घेण्यासाठी आलेल्या शरणार्थींचाच हात आहे, याला आता औपचारिक मान्यता मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५८ शरणार्थींना अटक केली असून त्यांपैकी २५ जण अल्जेरियाचे, २१ जण मोरोक्कोचे, तर ३ जण ट्युनिशियाचे नागरिक आहेत. आणखी अनेक आरोपींचा शोध घेणे चालू आहे.

१. यासंदर्भात पोलिसांत १ सहस्र ५४ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या शरणार्थींना महिलांना अयोग्य जागी स्पर्श करणे, त्यांच्या वस्तू लुटणे, धमक्या देणे आणि मित्रांपासून वेगळे करण्यासह त्यांचा विनयभंग अन् बलात्कार करणे, यांप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

२. गेल्या वर्षी इराक, सिरिया, अल्जेरिया, मोरोक्को आणि ट्युनिशिया या मुसलमान देशांतील ११ लाखांहून अधिक शरणार्थ्यांना जर्मनीने आश्रय दिला होता.

३. मुसलमान देशांत महिलांवर अनेक निर्बंध असतात. त्या तुलनेत जर्मनीसारख्या युरोपीय देशात महिला तोकड्या वेशात मुक्तपणे फिरतात. हे सर्व मुसलमान शरणार्थींना नवीन आहे. अशा रितीने त्यांची वासनांध वृत्ती बळावल्याने त्यांच्याकडून महिलाविरोधी गुन्हे घडतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

४. जे प्रकार ख्रिस्ती नववर्षदिनी घडले, त्याचीच पुनरावृत्ती या महिन्यात कोलोन शहरात झालेल्या कार्निवलमध्येही झाली. तेथे असे ६६ प्रकार घडले.

५. जर्मनीच्या चान्सलर अँजेेला मर्केल यांनी मुसलमान देशातील नागरिकांच्या संदर्भात स्वीकारलेल्या अत्यंत उदार धोरणामुळेच कोलोनसारख्या घटना घडत असल्याची सर्वसाधारण जर्मन जनतेची धारणा झाली आहे.

६. नववर्षदिनी घडलेल्या प्रकारामुळे मर्केल या चांगल्याच अडचणीत आल्या असून जनमत त्यांच्या विरोधात गेले आहे. पेगीडा आणि होगेसासारख्या अनेक राष्ट्रवादी संघटना देशात आंदोलन करत असून शरणार्थींना जर्मनीतून हद्दपार करण्याची मागणी या संघटना करत आहेत.

७. शरणार्थी जर्मनीच्या रूढी आणि परंपरांशी एकरूप होतील, अशी मर्केल यांची धारणा चुकीची आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *