Menu Close

पाकिस्तानमध्ये घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिल्याने तरुणाला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत अटक

भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणारे आणि पाकचा झेंडा फडकवणारे यांच्या विरोधात कधी अशी कारवाई होते का ?

पेशावर : पाकच्या खबर-पख्तूनख्वा प्रांतातील नारा अमाजी परिसरातील घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ लिहिणार्‍या साजीद शाह या तरुणाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये साजिदला ७ वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला जाऊ शकतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकांनी त्याला यामुळे राष्ट्रीय अभिमानाला ठेच पोहोचत असल्याने भिंतीवरून हे वाक्य पुसून टाकण्यास सांगितले होते; पण साजिद ऐकत नसल्याचे पाहून काही लोकांनी भ्रमणभाषवरून या वाक्याचे छायाचित्र काढून पोलिसांना पाठवले. त्यानंतर पोलिसांनी शाह यांच्यावर कारवाई केली.

साजिद एका कारखान्यात काम करतो. त्याला भारतीय चित्रपट आणि गाणी यांची प्रचंड आवड आहे. या चित्रपटांच्या प्रभावामुळे त्याने वरील प्रकारे वाक्य लिहून भारतप्रेम व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *