पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला !
शिरवळ (जिल्हा सातारा) : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण करून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीचे शिरवळ पोलिसांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री प्रशांत रेवडीकर, बंडू भिसे, केदार हाडके, कार्तिक सुतार, हितेश जाधव, अक्षय पवार, विजय कबुले, ओंकार वाघदरे, सचिन विश्वास, बाळू घोलप, अक्षय चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री ज्ञानेश्वर मसुरकर, सोमनाथ राऊत आणि विठ्ठल जाधव उपस्थित होते. (चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
मिरज येथे प्रांत अधिकार्यांना निवेदन
मिरज : पद्मावती प्रदर्शित होऊ नये, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने येथील प्रांत अधिकार्यांना देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मिरज येथील कोणत्याही चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित न होण्याचे आदेश द्यावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात