Menu Close

इस्लाममध्ये मृत्यूनंतरही स्त्री-पुरुषांमध्ये केल्या जाणाऱ्या पक्षपाताचे प्रतीक म्हणजे ताजमहाल !

‘धर्मप्रसार कार्यासाठी भारतात विविध ठिकाणी गेल्यानंतर राष्ट्र, धर्म, इतिहास यांच्या संदर्भातील अनेक सूत्रे जवळून अनुभवता आली. तेथे मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

ताजमहाल

मोगल बादशहा शहाजहानने त्याची पत्नी मुमताज हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ ताजमहाल ही वास्तू उभारल्याचे पसरवले गेले आहे. ताजमहालच्या मुख्य घुमटात मुमताजची कबर आहे. कालांतराने शहाजहानच्या मृत्यूनंतरही त्याला मुमताजच्या शेजारी दफन करण्यात आले. आज या दोन्ही कबरी शेजारी शेजारी आहेत; मात्र शहाजहानची कबर बनवतांना ती मुमताजच्या कबरीपेक्षा किंचीत उंच बनवण्यात आली आहे; कारण ‘इस्लाममध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांना वरचे स्थान आहे’, याचेच जणू ते प्रतीक आहे.

औरंगजेबाने शहाजहानला आगरा किल्ल्यावर नजरकैदेत ठेवले होते. तेव्हा त्याने शेवटची ८ वर्षे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या ताजमहालकडे पहात व्यतित केली. शहाजहानच्या मुमताजवरील त्या प्रेमाचा मान म्हणूनही त्यानंतरच्या इस्लामी राज्यकर्त्यांना ‘मुमताजच्या कबरीला प्राधान्य (मोठेपणा) द्यावे’, असे वाटले नाही, हे विशेष !

१. मनोरंजनातही क्रौर्य जोपासणारे मोगल बादशहा

आगरा येथील किल्ला पहातांना प्रत्येक स्थानाचे वैशिष्ट्य पहायला मिळते. आत बादशहाची मनोरंजनाची ठिकाणेही पहायला मिळतात आणि मनोरंजनाच्या पद्धती ताजमहाल परिसरात असलेल्या संग्रहालयातील चित्रांतून पहायला मिळतात.

१ अ. शहाजहानने आगरा किल्ल्यावर एक तळे बांधले होते. त्या तळ्यात अनेक रंगीबेरंगी मासे सोडलेले होते. शहाजहान आणि मुमताज या तळ्यावर एकमेकांसमोर बांधलेल्या सज्जात बसून बाणाने मासे टिपण्याचा खेळ खेळत असत. या खेळात शहाजान कधीच जिंकला नाही. याचे कारण येथील मार्गदर्शक (गाईड) गंमतीशीर सांगतात. म्हणे, शहाजहानने मासा टिपण्यासाठी तीर कमानीला लावला की, तो मुमताजच्या सौंदर्याकडेच पहात बसायचा. त्यामुळे त्याचे लक्ष विचलित होऊन तो मासा टिपू शकत नसे आणि मुमताज मासा टिपून प्रत्येक खेळ जिंकत असे.

शहाजहानच्या या हरण्याला प्रेमाचे कितीही वेष्टन चढवले, तरी सभ्यतेच्या दृष्टीकोनातून त्याला ‘स्त्रीलंपटपणा’ म्हटल्यास चूक काय ?

१ आ. आणखी एक ठिकाण असे आहे की, तेथे मोगल बादशहा दोन हत्तींच्या झुंजी आणि हत्ती-सिंह यांच्यातील झुंजी पहात असत. स्वतःच्या मनोरंजनासाठी दोन जीव झुंजवायचे किंवा त्यांचा बळी घ्यायचा, हे प्रकार क्रौर्य नव्हे, तर अन्य काय ?

२. काळाने मोगल साम्राज्याची केलेली क्रूर थट्टा !

आगरा येथील लाल किल्ल्यावरून अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब या चार बादशहांनी संपूर्ण भारतवर्ष इस्लाममय करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या कत्तली केल्या, सहस्रो मंदिरे पाडली. या ४ पिढ्यांच्या अथक परिश्रमांनंतरही भारत इस्लाममय तर झाला नाहीच, मात्र लाल किल्ल्याचा परिसरही इस्लाममय होऊ शकला नाही. आजही लाल किल्ल्याच्या शेजारी नवरात्रीत भव्य प्रमाणात रासलीला होतात. त्या परिसरात अनेक मंदिरे आहेत आणि हिंदूही मोठ्या संख्येने रहातात. ही काळाने मोगलांची केलेली क्रूर थट्टाच नव्हे काय ? मोगल साम्राज्य असलेला कोणताही देश ५० वर्षांनंतरही स्वतःची संस्कृती टिकवू शकला नाही; परंतु ज्ञानशक्तीमुळे हिंदू संस्कृती मात्र सहस्रो वर्षे टिकून राहिली आहे.’

– श्री. नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (८.१०.२०१७) (क्रमश:)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


‘धर्मप्रसार कार्यासाठी भारतात विविध ठिकाणी गेल्यानंतर राष्ट्र, धर्म, इतिहास यांच्या संदर्भातील अनेक सूत्रे जवळून अनुभवता आली. तेथे मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे येथे क्रमशः देत आहोत.

भारतीय पुरातत्व विभागाने भारतातील अनेक प्राचीन वास्तू संरक्षणाचे निमित्त करून स्वतःच्या कह्यात घेतल्या आहेत. या वास्तूंमध्ये किल्ले, हिंदूंची मंदिरे, मुसलमान शासकांच्या कबरी, मिनार यांचा समावेश आहे. या प्राचीन वास्तू देशाच्या इतिहासाचा जिवंत ठेवा आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने त्यांचे निष्पक्ष भूमिकेतून जतन करायला हवे. आगरा येथील ताजमहाल पहातांना ‘शासन आणि भारतीय पुरातत्त्व विभाग यांची दृष्टी निष्पक्ष नाही’, याची प्रचीती येते.

ताजमहालच्या सुरक्षेसाठी पुरातत्व विभाग आणि शासन यांनी केलेल्या उपाययोजना

अ. ताजमहालच्या पांढर्‍या वास्तूवर काजळी चढू नये, यासाठी शासनाने ताजमहालच्या काही किलोमीटर परिसरातील विटभट्ट्या बंद केल्या आहेत.

आ. वाहनांच्या धुराच्या प्रदूषणाचा परिणाम ताजमहालवर होऊ नये, यासाठी पर्यटकांची वाहने १ किलोमीटर लांब थांबवली जातात. तेथून पर्यटकांना चालत किंवा इतर रिक्षाने (प्रदूषण निर्माण न करणार्‍या वाहनाने) जाण्याचा पर्याय दिला जातो.

इ. ताजमहालाचा परिसर अस्वच्छ होऊ नये; म्हणून पाण्याच्या बाटलीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वस्तू परिसरात नेण्यास मज्जाव आहे.

ई. ताजमहालाच्या मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर लादीवर चरे पडू नयेत, यासाठी चप्पल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कोणाला चप्पल घालून इमारतीत प्रवेश करावयाचा असल्यास चपलांवर वेष्टन चढवण्याची सक्ती करण्यात येते. (ही वेष्टने ताजमहाल परिसरात विक्री केली जातात.) (क्रमशः)

राष्ट्र नि धर्म यांची दु:स्थिती दर्शवणारे भारतदर्शन !

धर्मप्रसार कार्यासाठी भारतात विविध ठिकाणी गेल्यानंतर राष्ट्र, धर्म, इतिहास यांच्या संदर्भातील अनेक सूत्रे जवळून अनुभवता आली. तेथे मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

हम्पी (जि. बळ्ळारी, कर्नाटक) येथील विठ्ठल मंदिरातील विश्‍वविख्यात दगडी रथ

१. हम्पी येथील मंदिरांतील शिल्पांकडे सरकारचे दुर्लक्ष

कर्नाटकातील हम्पी येथे हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या वास्तूंचे सौंदर्य आणि शिल्पे यांचे महत्त्व ताजमहालपेक्षा किंचित्ही गौण नाही, तरी ताजमहालच्या लादीवर चरे पडू नयेत, यासाठी दक्ष असणार्‍या पुरातत्व विभागाने मात्र हम्पीतील या हिंदूंच्या प्राचीन ठेव्याच्या रक्षणाकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी येथील शिल्पांची चोरी झाली आहे. देखभालीअभावी त्यांची मोडतोड झाली आहे. इतकेच नव्हे, तर धर्मांधांनी अनेक शिल्पांची हेतूत: मोडतोड केली आहे.

२. अजिंठा-वेरुळ येथील लेण्यांमधील अस्वच्छता सर्वांनाच परिचित आहे.

३. ताजमहालचे सौंदर्य टिकून रहावे, यासाठी पुरातत्व विभागाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; मात्र कोणार्क (ओडिशा) येथील अद्भुत सूर्यमंदिर वर्षानुवर्षे दुर्लक्षिले आहे.

४. सिंधुदुर्ग (जिल्हा महाराष्ट्र) येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे बुरूज ढासळलेले आहेत; पण त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षानुवर्षे निधी संमत होत नाही.

ताजमहाल आणि हिंदूंची प्राचीन मंदिरे यांना सरकारकडून मिळणार्‍या निधीची तुलना करता एक गोष्ट स्पष्ट होते. सरकारचे धोरण उघड आहे. ते म्हणजे, हिंदूंच्या प्राचीन वास्तू पहाण्यासाठी येणार्‍या पर्यटकांकडून तिकिटाच्या रूपात केवळ पैसा गोळा करणे.

५. पुरातत्व खात्याचा जुन्या मशिदी आणि प्राचीन मंदिरे यांसाठी वेगवेगळा न्याय का ?

५ अ. आगरा किल्ल्यावर बादशाहाच्या कुटुंबाला नमाज पढण्यासाठी बनवलेली मशीद पर्यटकांना पहाण्यासाठी उघडी आहे; मात्र येथे प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना पादत्राणे बाहेर काढून ठेवण्यास सांगितली जातात. याउलट कोणार्क येथील सूर्यमंदिर, अजिंठा-वेरूळ येथील लेण्यांमध्ये पर्यटक पादत्राणे घालूनच प्रवेश करतात.

५ आ. ताजमहाल पहाण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे, तरीही ताजमहाल प्रत्येक शुक्रवारी पर्यटकांसाठी बंद असतो आणि त्या दिवशी मुसलमानांना नमाज पढण्यासाठी खुला असतो. याउलट कोणार्क सूर्यमंदिर वा अन्य ठिकाणी विशिष्ट दिवशी विशेष प्रार्थना तर होत नाहीच, शिवाय तेथे पूजाही केली जात नाही.

– श्री. नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (८.१०.२०१७) (क्रमश:)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


धर्मप्रसार कार्यासाठी विविध ठिकाणी गेल्यानंतर राष्ट्र, धर्म, इतिहास यांच्या संदर्भातील अनेक सूत्रे जवळून अनुभवता आली. तेथे मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे येथे देत आहोत.

१. आगरा (उत्तरप्रदेश)

आगरा (आग्रा हा चुकीचा उच्चार आहे.) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा प्रचार केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची औरंगजेबाशी दिवाण-ए-खास येथे भेट करून देण्यात आली. तिथे त्यांना औरंगजेबाकडून पूर्व अटीनुसार सन्मानाची वागणूक मिळाली नाही. त्यामुळे भर दरबारात छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबासमोर अप्रसन्नता व्यक्त करून ते दरबारातून बाहेर पडले. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आगर्‍याहून सुरक्षितपणे सुटले, हा सर्व इतिहास सर्वांना ज्ञात आहे; परंतु आगरा येथे हा इतिहास सांगतांना आलमगीर औरंगजेबाची नाचक्की कोणाला समजू नये, अशी सोयीस्करपणे काळजी घेतली जात आहे.

१ अ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगरा येथील औरंगजेब भेटीविषयी चुकीचा इतिहास प्रस्तुत ! (म्हणे) छत्रपती शिवाजी महाराज उष्णतेमुळे बेशुद्ध पडल्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवले !

येथील पर्यटक मार्गदर्शक (गाईड) हा इतिहास अशा प्रकारे सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराज (येथे कोणीही छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करत नाहीत, तर केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख करतात.) जून-जुलै मासात आगरा येथे आले. या कालावधीत आगरा येथे असलेल्या तीव्र उष्णतेचा त्यांना त्रास होत होता. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना दिवान-ए-आम मध्ये (सामान्य जनतेने बादशहाला भेटण्याचे ठिकाण) भेटीसाठी बोलावले होते. सर्वसामान्य जनतेप्रमाणे आपल्यालाही बादशहाने दिवान-ए-आम मध्ये भेटीला बोलावले; म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संतप्त झाले आणि त्यांनी त्यांची अप्रसन्नता बादशहासमोर व्यक्त केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने भेटीसाठी दिवान-ए-खास (बादशहाने राजे-रजवाडे यांना भेटण्याचे विशेष ठिकाण) मध्ये बोलावले. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज तेथील उष्णतेमुळे घामाघूम होऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर औरंजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले.

येथील ‘गाईड’ छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान करत आहेत, हे पर्यटन खात्याच्या लक्षात कसे येत नाही ? पर्यटन खाते पोलिसांप्रमाणे झोपी गेले आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

१ आ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगरा भेटीविषयी इसिहासकारांनी कथन केलेले वास्तव !

आगर्‍याहून मार्गदर्शकाच्या (गाईड) माध्यमातून प्रसृत केला जाणारा हा इतिहास धादांत खोटा आहे. आतापर्यंतच्या इतिहासकारांच्या अभ्यासानुसार वास्तव असे आहे की,

१ आ १. छत्रपती शिवाजी महाराज जून-जुलै मासात नव्हे, तर मार्च मासात (वर्ष १६६६) आगरा येथे गेले होते. त्यांनी ऑगस्ट १६६६ मध्ये आगरा येथून आपली सुटका करून घेतली. मार्च मासात आगरा येथील हवामान थंड असते. या थंडीत छत्रपती शिवाजी महाराजांना घाम येणे शक्य नाही.

१ आ २. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना दिवान-ए-आम मध्ये नव्हे, तर दिवान-ए-खास मध्ये भेटीसाठी बोलावल्याचा उल्लेख आहे. तो आगरा येथील किल्ल्यावरील दिवान-ए-खास मध्ये पुरातत्व विभागाने लावलेल्या पाटीवर आहे, तरीही आगरा येथील मार्गदर्शक (गाईड) हा चुकीचा इतिहास हेतूतः प्रस्तूत करत आहेत.

१ इ. आगरा किल्ल्यात पर्यटकांपासून छत्रपतींच्या धैर्याचा इतिहास हेतूत: उपेक्षित !

आगरा येथील लाल किल्ला जसा मोगल बादशाहांच्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुल धैर्य, चातुर्य, राजकीय बुद्धीमत्ता यांची स्मृती आहे. एक राष्ट्रीय स्वाभिमान म्हणून या स्मृती लाल किल्ल्यावरही जोपासायला हव्यात, जेणेकरून भावी पिढीचा राष्ट्राभिमान जागृत राहील आणि त्यांना इतिहास पुरुषांच्या कर्तृत्वातून धडे मिळतील.

१ इ १. आगरा किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती पर्यटकांसाठी खुल्या नाहीत ! : आगरा येथील किल्ला पहातांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी शासन सतर्क आहे, असे जाणवले नाही. मिर्झाराजे जयसिंह यांच्याशी झालेल्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते आणि तिथे मोगल साम्राज्यासमोर हिंदु साम्राज्याच्या स्वाभिमानाच्या लढाईत औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कारावासात टाकले होते, हा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे; पण या स्मृती शासनाने आगरा किल्ल्यावर जोपासल्या नाहीत अन् त्या पर्यटकांसाठी खुल्याही ठेवल्या नाहीत.

१ इ २. छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलेल्या खोलीविषयी मार्गदर्शकांकडून पर्यटकांची दिशाभूल ! : छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत ६ मास राहिले होते. ते कारागृह आज पुरातत्व विभागाने बंद केले आहे. हा किल्ला पहातांना या स्थळाविषयी येथील मार्गदर्शकांना (गाईड्सना) विचारल्यावर ते दिवान-ए-खासच्या डाव्या बाजूला ५० फुटावर असलेल्या एका बंद जाळीदार दरवाज्याच्या खोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांना कैदेत ठेवले होते, असे सांगतात; पण त्यात तथ्य नाही. शाहिस्तेखानाची बोटे तोडणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य औरंगजेब जाणून होता. त्यामुळे स्वत:च्या उशाकडे यमदूत ठेवण्याचे धाडस तो निश्‍चितच करणार नाही. तात्पर्य, महाराष्ट्रातील पर्यटक आल्यावर त्यांना खूश करण्यासाठी मार्गदर्शकांनी (गाईड्सना) हे ठिकाण शोधून ठेवले आहे आणि त्यांची ही थापेबाजी चालू आहे.

दिवान-ए-खास

आगरा येथील काही जाणकार लोकांना विचारले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवलेले ठिकाण कोठे आहे ? तेव्हा समजले की, लाल किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलेला भाग सध्या सैन्यदलाच्या अखत्यारीत आहे. (आगरा किल्ल्याचा केवळ ३० टक्के भाग पर्यटकांसाठी खुला आहे, तर ७० टक्के भारतीय सैन्यदलाच्या कह्यात आहे.) त्यामुळे या भागात जाण्यासाठी कोणालाही मान्यता नाही.

१ इ ३. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत असलेल्या खोलीची पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे दुर्दशा ! : या ठिकाणची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवलेल्या ठिकाणाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. तेथे कोणतीही देखभाल-दुरुस्ती नाही. या संदर्भातील सर्वांत दुर्दैव म्हणजे आगरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट झाल्याचे भारतीय पुरातत्व खात्याने स्वीकारले आहे; पण किल्ल्यावर त्यांना नजरबंदी केले होते, याची इतिहासात कुठेही नोंद नाही, असे कारण सांगून नजरबंदीच्या प्रकरणाला भारतीय पुरातत्व खाते दंतकथा ठरवत आहे.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लाल किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा उल्लेख असलेली पाटी हटवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे २ वंशज सध्या संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. आधुनिक असे अनेक जाणते राजे महाराष्ट्रात आहेत. यांपैकी कोणीतरी पुरातत्व खात्याने आगरा किल्ल्यात मृतप्राय केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाला जिवंत करून भावी पिढीच्या राष्ट्राभिमानावर फुंकर मारण्याचे महत्कार्य करील का ? (क्रमशः)

– श्री. नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *