३ दशके जिहादी आतंकवाद झेलणार्या भारतात असा निर्णय कधी घेतला जाणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने या बंदीला अनुमती दिली. तसेच याची तातडीने कार्यवाही करण्याचा आदेशही दिला. इराण, लिबिया, सीरिया, येमेन, सोमालिया आणि चाड या मुसलमानबहुल देशांमधील नागरिकांना आता अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या देशांमधील नागरिकांकडून आतंकवादाचा धोका असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात