Menu Close

इसिसच्या अमानवीय क्रूरतेमागे असलेली मूळ विचारसरणी नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर पाऊले का उचलली जात नाहीत ?

कुटुंबियांना ठार करून इसिसने यझिदी युवतीला लैंगिक गुलाम बनवले !

लंडन : इसिसच्या (इस्लामिक स्टेटच्या) जिहाद्यांंनी २१ वर्षीय नादिया मुराद या यझिदी युवतीच्या ६ भावांची आणि आईची निर्घृण हत्या करून तिला लैंगिक गुलाम म्हणून विकले, अशी माहिती इसिसपासून सुटका झालेल्या नादियाने लंडन येथे दिली. शहरातील ट्रेड युनियन काँग्रेस सभागृहात आयोजित एका बैठकीत ती बोलत होती.

नादिया यावेळी म्हणाली की,

१. ती सध्या इसिसपासून पिडीत झालेल्या लोकांना एकत्रित करून इसिसविरुद्ध लढा देण्यासाठी प्रवृत्त करीत आहे.

२. गेले दीड वर्ष इराकमध्ये रहाणार्‍या यझिदी समाजावर इसिस अनन्वित अत्याचार करीत आहे.

३. या समाजातील सर्व पुरुषांची हत्या केली जाते आणि महिलांवर बलात्कार करून त्यांना लैंगिक गुलाम (सेक्स स्लेव्ह) म्हणून विकण्यात येते.

४. इसिसपासून या महिला आणि लहान मुलांची सुटका करण्याचे प्रयत्न होत असले, तरी आणखी ५ सहस्र ८०० यझिदी महिला आणि मुले इसिस रूपातील नरकवास भोगत आहेत.

५. अगदी ९ वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होत आहेत. इराकच्या सिंजार शहरात एका सामुहिक कबरीत १०० महिलांचे मृतदेह सापडले आहेत.

६. जगातील कुठलाही देश यझिदींच्या साहाय्याला आला नाही, अशी खंतही यावेळी नादियाने व्यक्त केली.

संदर्भ : टार्इम्स ऑफ इंडिया

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *