Menu Close

राजस्थानमध्ये गोतस्करांच्या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १ गोतस्कर ठार

गोरक्षकांना समाजकंटक म्हणणारे गोतस्करांच्या गोळीबाराविषयी कधीच बोलत नाहीत कि गोतस्करी बंद होण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, तेही सांगत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

अलवर (राजस्थान) : येथे ६ डिसेंबरच्या रात्री पोलीस आणि गोतस्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एक गोतस्कर ठार झाला, अन्य फरार झाले. ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून येथे गोतस्करीच्या घटना घडल्या होत्या. गोतस्कर बेवारस गायींना घेऊन जात होते. तसेच त्यांना रोखणार्‍यांवर ते गोळीबारही करत होते. एका घटनेत माजी पोलीस अधिकार्‍याला गोतस्करांनी गाडीने ठोकर मारली होती. (गोरक्षकांवर टीका करणारे गोतस्करांच्या विरोधात का बोलत नाहीत कि गोतस्करी योग्य आहे, असे त्यांना वाटते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *