Menu Close

इसिसला साहाय्य करणार्‍या ब्रिटिशांना मारून टाकायला हवे !- ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विलियमसन

  • ज्या ब्रिटिशांकडून लोकशाही स्वीकारली त्यांच्याकडून भारतीय शासनकर्ते राष्ट्रप्रेम शिकतील का ?
  • भारतात जिहादी आतंकवाद्यांना मोठ्या प्रमाणात साहाय्य केले जाते, काश्मीरमध्ये आतंकवाद्यांवर कारवाई करतांना सैन्यावर दगडफेक केली जाते, ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेस सहस्रो धर्मांध सहभागी होतात, यावर भारतीय शासनकर्ते निष्क्रीय रहातात, सैन्यावर दगडफेक करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेतले जातात ! त्यांच्या तुलनेत ब्रिटनचे शासनकर्ते आतंकवाद नष्ट करण्यासाठी अधिक प्रामाणिक आहेत आणि त्यातून त्यांची देशभक्ती दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

लंडन : इस्लामिक स्टेटचा (इसिसचा) एकही आतंकवादी ब्रिटनची हानी करू शकत नाही; मात्र जगभरात आतंकवाद पसरवणार्‍या इसिसला साहाय्य करणार्‍या  ब्रिटीश नागरिकांना शोधून त्यांच्यावर गोळ्या झाडायला हव्यात, असे प्रतिपादन ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विलियमसन यांनी केले आहे. आतंकवाद संपवण्यासाठी ब्रिटन कोणतेही पाऊल उचलायला सिद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (३ दशके आतंकवाद झेलणार्‍या भारतातील एकतरी शासनकर्ता असे म्हणतो का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही विधाने केली. पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक करण्यात आल्याच्या सूत्रावर त्यांनी ही विधाने केली.

ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत आहेत. अजूनही २७० जण मध्य-पूर्वेत आहेत. याविषयी गेविन म्हणाले की, आतंकवादाला साहाय्य करणारे ब्रिटीश नागरिक आता मायदेशी परतत आहे; पण आता त्यांना ब्रिटनमध्ये जागा नाही. हे लोक अन्य भागात लपून बसले असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. (भारतातील इसिसमध्ये भरती झालेले धर्मांध इसिसमधून परत भारतात येत असतील, तर भारतीय शासनकर्ते आणि तथाकथित निधर्मी त्यांना भारतात घेण्यास पुढाकारच घेतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *