हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाला यश
गंजिमठ (कर्नाटक) : गंजिमठ ग्रामपंचायतीने त्यांच्या भागात येणार्या सूरल्वाडी येथे एका धर्मांधाला गोमांस विक्रीचे दुकान उघडण्यासाठी अनुमती दिली होती. या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने एकत्रित आले. (धर्मावरील आघाताच्या विरोधात संघटित होणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी यातून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांनी ग्रामपंचायत आणि पोलीस यांना निवेदन दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीला गोमांसाच्या विक्रीच्या दुकानाला दिलेली अनुमती रहित करावी लागली. या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, ॐकार शाखा, हिंदु जागरण वेदिके, हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच भारतीय जनता पक्ष यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात