१. स्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सिद्ध केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या परीक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण
‘दीपावलीनिमित्त स्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने भांडुप (प.) येथे १२ शिवप्रेमी मंडळांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती सिद्ध केल्या होत्या. त्यांचे परीक्षण करण्यासाठी स्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे श्री. संतोष ब्रीद यांनी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. लक्ष्मण जठार, श्री. सचिन घाग आणि श्री. रमेश घाटकर यांना आमंत्रित केले होते. त्यांनी ७ मंडळांच्या प्रतिकृतींचे परीक्षण केले.
२. समितीच्या वतीने दोन मंडळांच्या ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन
स्पर्धेत सहभागी झालेले ‘जय कोकण मित्र मंडळ’ आणि ‘गोल्डन मित्र मंडळ’ यांनी बनवलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. लक्ष्मण जठार यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले.
३. सहलीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या युवा धर्माभिमान्यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन
तळोजा येथील धर्माभिमानी श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनी २९ आणि ३० ऑक्टोबर असे २ दिवस ४० युवा धर्माभिमान्यांना घेऊन ‘शिवनेरी’ आणि ‘ओझर’ या ठिकाणी सहल आयोजित केली होती. या सहलीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर आणि श्री. पंकज आंबेरकर सहभागी झाले होते. या दोघांनी सहलीच्या निमित्त एकत्र आलेल्या युवकांचे ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयावर प्रबोधन केले.
४. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती
२३ ते २९ ऑक्टोबर या सप्ताहात विविध नियतकालिकांतून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित ८ विषयांवर पत्रलेखन करण्यात आले. यांमध्ये १९ मराठी नियतकालिकांतून ४९, ३ विषयांवर १६ हिंदी नियतकालिकांना पाठवलेली २४ पत्रे प्रसिद्ध झाली. २ विषयांवर एका गुजराती नियतकालिकास पत्र पाठवण्यात आले. एका विषयावर १० इंग्रजी नियतकालिकांना पत्र पाठवण्यात आले. पत्रलेखन सेवेच्या अंतर्गत एका विषयावर ६ मराठी नियतकालिकांना पाठवण्यात आलेल्या एका लेखास प्रसिद्धी मिळाली.’
– श्री. सागर चोपदार, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई. (नोव्हेंबर २०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात