बांगलादेशातील हिंदूंसाठी केंद्रातील भाजप सरकार काहीच करत नाही, हे सरकारला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : धर्मांधांपाठोपाठ आता बांगलादेशच्या प्रशासनानेही हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस आणि मूर्तींची विटंबना करण्याचे प्रकार चालू केले आहेत. ३ डिसेंबर या दिवशी मैमनसिंह जिल्ह्यातील पंचायत प्रमुख लोकमान हुसेन, सचिव श्रीमती बाणांनी विश्वास आणि न्यायाधीश अबुल हशमत लोकमन यांनी सशस्त्र पोलिसांचे साहाय्य घेऊन राजा विजय सिंग शिवा मंदिर आणि दुर्गा मंदिर उद्ध्वस्त केले अन् त्यातील देवतांच्या मूर्ती फेकून दिल्या. यासाठी तेथे रिक्शास्थानक इत्यादी अवैध बांधकाम झाले, असे कारण प्रशासनाने दिले. (अवैध बांधकाम पाडण्याऐवजी मंदिरच पाडणारे प्रशासन हिंदूंना मूर्ख समजते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदु नेते अधिवक्ता बिकाश राय यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. युसुफ खान पठाण यांची भेट घेतली. तसेच बांगलादेशमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेश मायनॉरीटी वॉच या संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनीही प्रा. युसुफ खान पठाण यांच्याशी संपर्क साधला. प्रा. पठाण यांनी मंदिराच्या विध्वंसासाठी अवैध बांधकाम झाले, असेच कारण दिले; मात्र असे करतांना मंदिर व्यवस्थापनाला पूर्वसूचना देणे आवश्यक होते, असे अधिवक्ता घोष यांनी सांगितले. त्यावर लेखी सूचना दिली नव्हती, असे मान्य केले आणि केवळ तोंडी दिले होते, असे उत्तर प्रा. पठाण यांनी दिले. (यावरून बांगलादेश प्रशासन हिंदु धर्मविरोधी कारवाया करण्यात किती तत्पर असते हे दिसून येते. बांगलादेशला भारताने स्वातंत्र्य मिळवून दिले, याची थोडीशीही जाणीव तेथील धर्मांध आणि प्रशासन यांना नाही हे दुर्दैव ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
वरील घटनेविषयी अधिवक्ता रवींद्र घोष यांनी उपायुक्त ख्लीलूर रहमान यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. या घटनेचा निषेध करून पाडलेल्या मंदिराचे पुनर्निर्माण करून त्यात विधिवत् मूर्ती स्थापन कराव्यात, अशी मागणी अधिवक्ता घोष यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात