Menu Close

मदरशांत शिकणारी मुले मौलवी किंवा आतंकवादी बनतील ! – कमर जावेद बाजवा

  • आतंकवादी बनतील, नव्हे तर बनले आहेत आणि त्यांचा वापर पाकचे सैन्यच भारताच्या विरोधात करून घेत आहे. यावर बाजवा काय कारवाई करणार आहेत, ते त्यांनी सांगायला हवे !
  • पाकच्या सैन्यदल प्रमुखांनी सांगितलेले सत्य भारतातील एकतरी राजकारणी किंवा शासनकर्ता म्हणू शकतो का ?
  • पाकमधील मदरसे आतंकवादी बनवण्याचे कारखानेच आहेत, तसेच भारतातील काही मदरशांतून आतंकवादी पकडले गेल्याचे उघड झाले; मात्र भारतात कोणीही निधर्मीवादाच्या नावाखाली याविषयी तोंड उघडत नाहीत !
  • भारतीय शासनकर्ते मदरशांना अनुदान देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे डोळे आतातरी उघडतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात   

क्वेट्टा (पाकिस्तान) : पाकिस्तानच्या मदरशांत शिकणारी मुले एकतर मौलवी बनतील किंवा आतंकवादी; कारण पाकमध्ये इतक्या मशिदी नाहीत की, या सर्वांना तेथे नोकरी मिळू शकेल, असे परखड प्रतिपादन पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी क्वेट्टा येथे युवकांच्या परिषदेत केले.

जनरल बाजवा पुढे म्हणाले की, मी मदरशांच्या विरोधात नाही; मात्र मदरशांमध्ये मुलांना केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. येथील मुले जगाच्या तुलनेत मागे रहातात. (असे सत्य भारतातील शासनकर्ते कधी सांगतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मदरशांतून मिळणार्‍या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना काहीच लाभ होत नाही; कारण जगामध्ये काय चालू आहे, याविषयी मदरशांमध्ये काहीच सांगितले जात नाही. देवबंद मुसलमानांकडून चालवण्यात येणार्‍या मदरशांमध्ये २५ लाख मुले शिक्षण घेत आहेत. ते वाईट शिक्षणामुळे मागे रहात आहेत. आता मदरशांविषयीचे जुने धोरण पालटण्याची आवश्यकता आहे. येथील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. बाजवा यांनी सैन्याविषयी म्हटले की, माझा लोकशाहीवर विश्‍वास आहे. सैन्य संरक्षण आणि विकास यांमध्ये त्याची भूमिका साकारत रहाणार आहे. सैन्याची स्थापना देशाच्या सेवेसाठीच झाली असून ते त्याचे काम चालूच ठेवील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *