चीन आणि अमेरिका यांच्याकडून त्यांच्या नागरिकांना सूचना
- पाकमधील आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या अमेरिका आणि चीन यांना अशा सूचना द्याव्या लागतात, हा त्यांना मिळालेला धडा आहे !
- चीन अद्यापही अझहर मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याला विरोध करत आहे, हा चीनचा दांभिकपणाच आहे !
- पाकमध्ये आतंकवाद वाढलेला असतांना अमेरिकाही त्याच्यावर कारवाई करत नाही किंवा त्याला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य बंद करत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : पाकिस्तानात आतंकवाद्यांकडून होणार्या संभाव्य आक्रमणांमुळे जिवाला धोका आहे. त्यामुळे आवश्यकता नसतांना पाकिस्तानात जाऊ नका, अशा सूचना अमेरिका आणि चीन यांनी त्यांच्या देशांतील नागरिकांना दिल्या आहेत. ‘सर्व दक्षिण आशियायी देशांत आवश्यकता नसतांना प्रवास करू नका’, असेही अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी २२ मे या दिवशी अमेरिकेने अशाच सूचना त्यांच्या नागरिकांना दिल्या होत्या.
पैशांसाठी आतंकवादी अपहरण करत आहेत. आतंकवाद्यांनी अमेरिकेच्या दुतावासालाही यापूर्वी लक्ष्य केले आहे. सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि आदिवासी यांवर होणारी आक्रमणे ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे, असे अमेरिकेने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. (वर्ष १९४७ पासून आतापर्यंत पाकमध्ये हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, त्यांचा वंशसंहार केला जात आहे, याविषयी अमेरिका का बोलत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात