विकास आराखडा वादाच्या भोवर्यात
हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा सरकारी प्रयत्न नव्हे का ? श्री गणेशमूर्ती विसर्जनाची जागा अन्य धर्मियांना देणार्या सरकारने हिंदु धर्मियांसाठी अशीच कृती केली असती का ? उलट काही मंदिरांची कागदपत्रे असतांनाही ती पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
उल्हासनगर (जिल्हा ठाणे) : सरकारकडून विकास आराखड्यात दफनभूमीसाठी येथील कैलास कॉलनीतील श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असलेली जागा आणि सम्राट अशोकनगर येथील शाळेची जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे; मात्र असे करतांना दफनभूमीसाठी मिळालेल्या जागेचे आरक्षण हटवून त्या ठिकाणी ‘पब्लिक युटिलिटी’चे आरक्षण देण्यात आले आहे. या तरतुदीमुळे शहराचा विकास आराखडा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. दफनभूमीसाठी गेली कित्येक वर्षे चालू असलेल्या प्रयत्नांनंतर स्थानिक बांधकाम व्यावसायिकाने स्वत:ची काही जागा पालिकेकडे सुपुर्द केली होती; मात्र या विकास आराखड्यातील नवीन तरतुदींमुळे पुन्हा पेच निर्माण झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात