मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात नाती जपूया या विषयावर मार्गदर्शन
चिंचवड : आपल्या धर्माचे कट्टरतेने पालन करणे अत्यावश्यक आहे. तसे करून मग इतर धर्मांचा आदर करणे म्हणजे खरा सर्वधर्मसमभाव आहे. अनेक जण वृद्धाश्रमाचा पर्याय निवडण्यात आला. वृद्धाश्रमात अनेक वृद्ध असतांनाही तेथील प्रत्येक जण एकटेपणाचे सामूहिक जीवन जगत आहे, असे परखड मत अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात नाती जपूया या विषयावर बोलतांना व्यक्त केले. या वेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, ट्रस्टचे विश्वस्त आणि स्थानिक उपस्थित होते.
या सोहळ्याची सांगता ८ डिसेंबर या दिवशी झाली. त्यादिवशी पहाटे श्री मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा मंदार देव महाराज यांच्या हस्ते झाली. त्यानंतर श्री मोरया गोसावी यांची दिंडी काढून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. समारोपानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या सोहळ्यात विविध विषयांवर मार्गदर्शने, कीर्तने, भजन आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. भक्त आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घेतला.
अपर्णा रामतीर्थकर पुढे म्हणाल्या…
१. नात्यांमध्ये विश्वास निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज-काल सासू सुनांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. अत्यंत क्षुल्लक गोष्टींवरून तंटा झाल्याने संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना वारंवार समोर येतात. त्यामुळे प्रथम घरातल्या महिलांनीच महिलांना समजून घेऊन त्यांना मान-सन्मान द्यायला हवा. तरच इतरांकडून सन्मान मिळवण्याविषयी विचार करता येईल.
२. स्त्री-पुरुष यांनी अर्धी-अर्धी कामे करणे स्त्री-पुरुष म्हणजे समानता होत नाही. एकमेकांविषयी जाणीव निर्माण करणे आणि ती कायम मनात ठेवणे, हीच खरी स्त्री-पुरुष समानता आहे. संसार सुखाचा करायचा असेल, तर दायित्व झटकून चालणार नाही. घरातील माणसांना सांभाळत आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे हेच करिअर आहे.
या वेळी सोहळ्यात जगद्गुरु शंकरायाचार्य महाराज उपस्थित होते. आपल्याला टिकून रहायचे असेल तर धर्माचे आचरण करायलाच हवे. आपण धर्माने वागलो तरच विनाश टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात