‘प्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांनी अंदमानच्या ‘सेल्यूलर जेल’मधील त्यांचे अनुभव आणि तेथे क्रांतीकारकांसंदर्भात योग्य माहिती पुरवण्याची व्यवस्था नसणे, या विषयांवर एका लेखातून प्रकाश टाकला आहे. लेखातून लेखकाने अंदमानची ‘सेल्युलर जेल’ असो कि भारतातील अन्य ऐतिहासिक स्थळे, त्यांचे योग्य जतन नि संवर्धन करण्यात आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी अपेक्षित लक्ष घातलेलेच नाही, याकडे लक्ष वेधले.
या लेखात श्री. पोंक्षे म्हणाले, ‘‘मी गेली ७ वर्षे सातत्याने अंदमानला जात आहे. तेथे ‘सेल्युलर जेल’मध्ये जात असतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी व्याख्यान घेतो. तेथे अनेक राज्यांतून लोक येतात. त्यांच्यासमवेत ‘गाईड’ असतो. तेव्हा गाईड काय सांगतो, ते मुद्दामहून ऐकले. गाईड म्हणाला, ‘‘देखो, यहां गोरे लोगों ने कैदियों को रखा था. यहां उनको अलग अलग सजा दी जाती थी. अब देखो और एक घंटे में वापस आना है.’’ सावरकरांविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘वो सावरकर को दूसरे माले पे रखा था. अब समय कम है, जल्दी वापस आओ.’’ स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी तेथे केवळ एवढीच माहिती दिली जाते.’ अशा ऐतिहासिक ठिकाणी ‘गाईड’ काय माहिती सांगतो, हे सरकारला ठाऊक नसते का ? सरकारकडून केवळ पाठ्यपुस्तकातील दिशाभूल करणारा इतिहास पालटणे अपेक्षित नाही, तर लोकांना ऐतिहासिक ठिकाणी सत्य इतिहास सांगण्याची व्यवस्था करणेही अपेक्षित आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात