काशी विश्वेश्वर मंदिराच्या गाभार्यात महिलांना दर्शन घेण्यास अनुमति असल्याचे उदाहरण देऊन त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा, असे म्हणणार्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता काय म्हणणार ? – संपादक, हिंदु जागृती
वाराणसी : देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात भाविकांच्या स्पर्शाने आणि विविध प्रकारच्या अभिषेकामुळे पिंडीवर विपरीत परिणाम होत असल्याने, आता पिंडीला स्पर्श करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विश्वेश्वराचे दर्शन काही अंतर दुरूनच घ्यावे लागणार आहे.
१. विश्वेश्वराच्या दर्शनाला येणारे भाविक पिंडीला केवळ स्पर्श करून थांबत नाहीत तर त्यावर माथाही घासतात.
२. त्याचप्रमाणे पिंडीवर दही, दूध अशा पदार्थांचा अभिषेक केल्याने पिंडीवर रासायनिक प्रक्रीया होऊन त्याचा विपरीत परिणाम पिंडीवर होत असल्याचे दिसून आले आहे. (जर असे आहे, तर मंदिर व्यवस्थापन आणि मंदिरातील पुजारी इतकी वर्ष गप्प का होते ? – संपादक, संपादक, हिंदु जागृती)
३. त्यामुळे यापुढील काळात विश्वेश्वराच्या पिंडीला स्पर्श करण्यास आणि जलाभिषेकाशिवाय इतर पदार्थांच्या अभिषेकावरही बंदी घालण्यात आली आहे.
४. केवळ मंदिरातील पुजारी, सेवेकरी यांना चार वेळा केली जाणारी आरती, नैवेद्य आणि पूजेच्या वेळेला पिंडीला स्पर्श करण्याची मुभा मिळणार आहे. (यावरून पुरो(अधो)गाम्यांनी महिला पुजार्याची मंदिरात नेमणूक करण्यात यावी, अशी ओरड करायला आरंभ केल्यास, कोणाला आश्चर्य वाटू नये ! – संपादक, हिंदु जागृती)
संदर्भ : माझा पेपर