Menu Close

(म्हणे) ‘मरणारा माझा नातेवाईक असता, तर आतंकवादी बनलो असतो !’ – अभिनेता एजाज खान

राजस्थानमधील लव्ह जिहादच्या विरोधातील हत्येचे प्रकरण

गेल्या १ सहस्र २०० वर्षांत धर्मांधांकडून अगणित हिंदूंच्या हत्या झाल्या. फाळणीच्या वेळी १० लाख हिंदूंना ठार करण्यात आले, असंख्य महिलांवर बलात्कार झाले, काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, असंख्य हिंदूंच्या हत्या झाल्या. आजही उत्तरप्रदेश, आसाम, बंगाल, केरळ आदी ठिकाणी हिंदूंच्या हत्या होतात, त्यांना पळवून लावले जाते. असे असतांनाही ‘हिंदू आतंकवादी होण्याचे बोलत नाहीत किंवा आतंकवादी होतही नाहीत’, हे ढोंगी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी लक्षात घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : राजस्थानच्या राजसमंद येथे लव्ह जिहादच्या प्रकरणातून एका मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवरून अभिनेता एजाज खान याने टीका केली आहे. ‘मरणारी व्यक्ती माझे वडील किंवा नातेवाईक असती, तर मी आतंकवादी बनलो असतो आणि हातात शस्त्र घेतले असते’, असे विधान केले आहे. मुसलमानाच्या हत्येची चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यावर खान याने प्रश्‍न विचारला, ‘जर मरणार्‍या व्यक्तीच्या मुलाने ही चित्रफीत पाहिली, तर तो आतंकवादी बनणार नाही का ?’

खान याच्या या विधानांची चित्रफीत प्रसारित झाली आहे. त्याने पुढे म्हटले आहे की, ‘मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे लोक पाकिस्तानशी धंदा करतात आणि आपल्यामध्ये भांडणे लावतात. अशा लोकांच्या विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.’ (पाकिस्तान, जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, बांगलादेशीयांची घुसखोरी याविरोधात एजाज खान कधी असे आवाहन करतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *