Menu Close

मेरठ येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार

अशा घटना रोखण्यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

मेरठ (उत्तरप्रदेश) : मेरठ जिल्ह्यातील शोभापूर येथे रहाणार्‍या एका हिंदु तरुणीला धर्मांधांनी भ्रमणभाषवर संपर्क करून तिला हिंदु असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री केली. या मैत्रीनंतर तिला चित्रपटगृहामध्ये भेटायला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अमीरुद्दीन आणि वसीम या दोघांना अटक केली आहे. या तरुणीला चुकीच्या क्रमांकावरून भ्रमणभाष आला होता. संपर्क करणार्‍या युवकांसमवेत नंतर तिची मैत्री झाली होती. संपर्क करणार्‍या धर्मांधाने स्वतःचे नाव अमर असे सांगितले होते. (लव्ह जिहाद प्रकरणातील धर्मांध तरुणांची नेहमीची पद्धत ! हिंदु तरुणींनी भ्रमणभाषचे रिचार्ज करतांना एखाद्या धर्मांध दुकानदाराला क्रमांक दिल्यावर तो अशा तरुणींचे क्रमांक लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांध युवकांना देतो आणि मग हे तरुण त्या तरुणींना संपर्क करून मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी ते स्वतःचे नाव पालटून हिंदु असल्याचे सांगतात. यात फसलेल्या तरुणीला नंतर भेटायला बोलावून तिच्यावर अत्याचार करतात किंवा तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करतात आणि नंतर तिला उपभोगून सोडून देतात ! अशा प्रकारांपासून हिंदु तरुणींनी सतर्क रहायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *