श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : इस्लामपूर शहराचे नामकरण ‘ईश्वरपूर’ व्हावे, यासाठी शहरातील सहस्रो नागरिकांच्या स्वाक्षर्यांच्या प्रस्तावाविषयी निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आनंदा कांबळे यांना देण्यात आले.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढून वाहतुकीसाठी रस्ते मोठे करावेत आणि गतीरोधक वाहतुकीच्या नियमाप्रमाणे बसवावेत. अनावश्यक गतीरोधक काढून टाकावेत.
२. शहराच्या मध्यभागी असलेल्या क्रीडांगणामधील अतिक्रमणामुळे घाण पसरलेली आहे. त्यामुळे खेळाडूंना क्रीडांगणाचा वापर करता येत नाही. यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी.
३. शहरातील आणि उपनगरातील रस्ते अन् गटारींची प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करावीत.
४. शहरातील शौचालये, गटारी स्वच्छ करणारे, कचरा गोळा करणारे आणि अन्य कामे करणारे ठेकेदार कामगार यांना त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा साहित्य द्यावे आणि त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे देण्यात यावे.
वरील कामे पूर्ण न झाल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली. निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड, भरत पाटील, शेखर खांडेकर, सुजित शिंदे, सुशांत सूर्यवंशी, राष्ट्रीय समाज पक्षाचे वाळवा तालुका अध्यक्ष श्री. सतीश इदाते, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष कुंभार, भरत जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात