ज्ञानेश्वरीचा कैद्यांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे स्पष्ट
संत साहित्याला बुरसटलेले म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? जनतेला धर्मशिक्षण मिळण्यासाठी शासनकर्त्यांनी शालेय शिक्षणापासून सर्वच स्तरांवर अशा प्रकारे उपक्रम राबवले पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ‘ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा’ उपक्रम चालू करण्यात आला. यामुळे कारागृहातील शेकडो कैद्यांचे वागणे, बोलणे आणि विचार यांत अभूतपूर्व सुधारणा झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले. तसेच दिवसेंदिवस सोहळ्याला कैद्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील इतर कारागृहांत राबवण्यात येईल, असे कारागृह महानिरीक्षक तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.
विविध गुन्ह्यांतील न्यायाधीन बंदीवान (कच्चे बंदीवान) आणि शिक्षा झालेले ज्येष्ठ बंदीवान यांच्या मानसिकतेत अन् विचारांत चांगले पालट घडवून आणण्यासाठी ‘समर्थ शांतीदूत परिवार आणि समर्थ परिवार’ यांच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहात १ डिसेंबरपासून ‘ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा’ आयोजित करण्यात आला. बंदीवानांच्या मानसिकतेत पालट घडवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या पुढाकाराने कारागृहात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित केला होता.
कुराण आणि बायबल यांचेही वाटप होणार
ज्ञानेश्वरी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या ‘जमात ए इस्लाम’च्या फरजना सैय्यद यांनी काही बंदीवानांना ‘कुराण’चे वाटप केले, तर आगामी काळात काही दानशूर व्यक्तींकडून बंदीवानांना ‘बायबल’ वाचण्यासाठी दिले जाणार आहे, असे मान्यवरांनी सांगितले. (हिंदु बंदीवानांनो सावधान ! यापूर्वीच्या उदाहरणांवरून अशा प्रकारांमधून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात