Menu Close

सौदी अरेबियाची इस्लामी कट्टरतेपासून सुधारणावादाकडे वाटचाल

  • सौदी अरेबियाने प्रथम जिहादी संघटनांना आणि भारतासारख्या देशांतील धर्मांधांना आर्थिक पुरवठा करणे बंद केले पाहिजे !
  • सौदीमध्ये लपून रहाणार्‍या आतंकवाद्यांवर आणि आंतरराष्ट्रीय गुंडांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या देशाकडे सोपवले पाहिजे !
  • सौदीने केलेले सुधारणेचे पालट सौदीतील अरबांना आदर्श मानणारे भारतातील मुसलमान स्वीकारून तसे वागतील का ?
  • मुसलमानांना कट्टरतेची शिकवण देणार्‍या सौदीमधील वहाबी लोकांना कारागृहात डांबले पाहिजे आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रसार होणार नाही, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !
  • सौदीमध्ये कामानिमित्त रहाणार्‍या भारतासहित अन्य देशांतील नागरिकांवर अत्याचार होणार नाहीत, यावर लक्ष ठेवले पाहिजे, तसेच त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यास मोकळीक मिळण्यासाठी अनुमती दिली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : इस्लामविषयी कट्टर असणारा सौदी अरेबिया आता सुधारणावादाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या वर्षभरात त्याने अशा प्रकारचे काही निर्णय घेतले आहेत. यात महिलांना वाहन चालवण्याची अनुमती मिळणे, चित्रपट आणि संगीत महोत्सव साजरे होणे आदी काही उदाहरणे आहेत. या सुधारणांमागे सौदीचे ३२ वर्षीय राजकुमार महंमद बिन सलमान हे आहेत. (सौदी आणि अन्य आखाती देशांतील पेट्रोल अन् डिझेल यांसारख्या तेलांचा व्यापार न्यून झाल्यामुळे आर्थिक कारणांमुळे सौदीकडून ही उदारता आणि सुधारणा होऊ लागल्या आहेत, असेच तज्ञांचे मत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. राजकुमार महंमद बिन सलमान यांच्याविषयी मुसलमान महिला ट्वीट करून म्हणत आहेत की, त्या आता २१ व्या शतकाशी जोडल्या जाऊ शकतात. सलमान इतिहास पालटल्याचा प्रयत्न करत आहेत.

२. राजकुमार सलमान यांनी ऑक्टोबरमध्ये एका कार्यक्रमात म्हटले होते की, गेल्या ३० वर्षांपूर्वी सौदी अरेबिया जसा होता, तसा आता नाही. आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.

३. सलमान सध्या राजकुमार आहेत. ते जेव्हा राजा बनवतील, तेव्हा ते पहिले पदवीधारक राजा असतील. त्यांच्याकडे विधी विषयाची पदवी आहे, तसेच त्यांना एकच पत्नी आणि ४ मुले आहेत. त्यांच्या आजोबांना २३ पत्नी आणि ४५ मुले होती.

कट्टर सौदीमध्ये झालेले काही सुधारणावादी पालट

१. इस्लामी कायद्यांचे पालन करवून घेणार्‍या धार्मिक पोलीस ‘मुतावा’चे अधिकार न्यून करण्यात आले आहेत.

२. फेब्रुवारीमध्ये जेद्दा येथे सौदीमधील पहिला ‘कॉमिक कॉन फेस्टिवल’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी लोकांनी म्हटले होते की, त्यांना वाटत नाही की ते सौदी अरेबियामध्ये आहेत.

३. सौदीमध्ये अनेक सरकारी सुविधा घेण्यासाठी वडील, पती, भाऊ अथवा मुलगा यांची अनुमती घेण्याची आवश्यकता होती. आता हा नियम रहित करण्यात आला आहे.

४. येथे चित्रपट महोत्सवही साजरा करण्यात आला. सर्वांत मोठ्या ‘अरेबियन सेंट्रल’ या मॉल बनवणार्‍या आस्थापनाने १० नवीन मॉलमध्ये चित्रपटगृह बनवण्याचे नियोजन केले आहे.

५. मदीना येथे एक विशेष संकुल बनवण्यात येणार आहे. येथे इस्लामचे तज्ञ येऊन चर्चा करून इस्लामच्या नावाखाली चालणार्‍या धर्मांधतेवर बोलतील.

६. यावर्षी सौदीमध्ये ‘पॉप’ संगीताचा कार्यक्रमही झाला होता.

७. सप्टेंबर २०१७ मध्ये सौदीच्या ८७ व्या स्थापनादिनानिमित्त प्रथम महिलांना कार्यक्रमासाठी स्टेडियममध्ये जाण्याची अनुमती देण्यातआली होती.

८. सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे प्रकल्प बनवण्यात येत आहेत. ते वर्ष २०१९ मध्ये चालू होतील.

९. सौदीमध्ये लवकरच रिसॉर्टसारखी ठिकाणे बनवण्यात येणार आहेत. येथे येणार्‍या पर्यटकांना कोणताही ‘ड्रेस कोड’ नसणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *