असे राष्ट्राभिमानी नागरिक सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
काणकोण (गोवा) : मास्तीमळ, काणकोण येथील शाहिदा खान (बानू खान) हिच्या घरावर चाँदतारा असलेला मोठा ध्वज लावण्यात आला होता. ही गोष्ट परिसरातील राष्ट्राभिमान्यांना समजताच मोठ्या प्रमाणात जमलेल्या राष्ट्राभिमान्यांनी या महिलेला खडसावले आणि ध्वज उतरवला.
मास्तीमळ, काणकोण येथून यंदा प्रथमच सुमारे ३०० मुसलमानांनी मास्तीमळ येथील साईबाबा मंदिराजवळून पाटणे येथील मशिदीपर्यंत ईदची फेरी काढली. कोणतीही परंपरा नसतांना गावात असा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याने याचे पडसाद संपूर्ण काणकोणमधील हिंदुत्वनिष्ठांच्या मनात उमटले. १० डिसेंबर या दिवशी साईबाबाच्या मंदिराजवळ स्थानिक युवाशक्ती, महिलाशक्ती, रा.स्व. संघ, हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित करून बैठकीनंतर गावात अशांती निर्माण करणार्या विघातक शक्तीविरुद्ध ठोस कृती म्हणून त्यात गुंतलेल्यांना खडसावण्याचा निर्णय घेण्यात आला. साईबाबाच्या मंदिरासमोरील ‘रियाझ’ या व्यक्तीच्या घरावर ईदची फेरी चालू होण्यापूर्वी चाँदतारा असलेला मोठा झेंडा लावण्यात आला होता. येथील आंब्याच्या झाडापासून रस्त्यापर्यंत चाँदतारा असलेल्या पताका लावण्यात आल्या होत्या. वाड्यावरील १७ मुसलमान घरांपैकी १४ घरांवर असेच मोठे झेंडे लावण्यात आले होते. यापैकी शाहिदा (बानू) खान हिच्या घरावर लावण्यात आलेले मोठे झेंडे उतरवण्यास भाग पाडले. यात युवकांसह, महिला आणि वृद्ध हिंदूंचाही सहभाग होता. या वेळी मास्तीमळ हे धार्मिक पवित्र क्षेत्र असून या ठिकाणी बकर्यांचा बळी देणे ही कृती अत्यंत वाईट आणि अयोग्य गोष्ट आहे, असे स्थानिक मुसलमानांना सांगण्यात आले. ‘भविष्यात कधीही अशा गोष्टी होऊ नयेत. येथून कधीच ईदची फेरी काढता कामा नये, कोणत्याही घरावर पाकचा चाँदतारा असलेला ध्वज लावू नये, ज्यांना अशा गोष्टी करायच्या आहेत, त्यांनी पाकमध्ये जावे’, अशा संतप्त प्रतिक्रिया जमलेल्या प्रत्येक हिंदु युवकाकडून व्यक्त होत होत्या. भविष्यात अशा गोष्टी दिसल्या, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणीही हिंदूंनी दिली आहे. सकाळी १० वाजता जमलेले स्थानिक दुपारी १२.३० वाजेपर्यंत रियाझ ही व्यक्ती येईपर्यंत थांबले आणि तो आल्यानंतर त्यांनी त्याला खडसावले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात