Menu Close

जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन मुलीस पळवणार्‍या धर्मांधाला पुण्यात अटक

पुणे : जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन मुलीला पळवून आणणार्‍या धर्मांधाला पुणे पोलिसांनी हडपसर ससाणेनगर येथून अटक केली. रोशनलाल नाबुमिया अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन पुण्यात आला होता. त्यामुळे जम्मू-काश्मीर कुलगाव येथील पोलिसांनी पुणे पोलिसांना याची माहिती देत साहाय्य मागितले होते. त्यानुसार गुन्हे शाखा ५ च्या पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपीचा माग काढून त्याला हडपसर ससाणेनगर येथून कह्यात घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *