उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
उल्हासनगर (जिल्हा ठाणे) : शहरात मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालू असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच बारमधील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पोलीस उपायुक्तांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊनही पालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. (अनधिकृत मंदिरे तत्परतेने पाडणारी पालिका बारमधील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई का करत नाही ? कि त्यांचे साटेलोटे आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दोन्ही विभागांतील असमन्वयामुळे बारचालकांचे फावले आहे. अखेर शहरातील डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजप युवा मोर्च्याच्या अध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. (जे भाजपच्या युवा अध्यक्षांना कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणारी पालिका आणि पोलीस यांना कळत कसे नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
१. उल्हासनगर शहरात बिअर शॉप आणि बार यांसह, ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारची संख्या वाढत आहे. हुक्का पार्लरची एक नवीन विकृती शहरात पाय पसरवत आहे.
२. डान्सबारमध्ये तरुणींचा वापर होत असल्याने पोलिसांनी शहरातील डान्सबारवर कारवाईचा बडगा उगारला होता. तरी डान्सबार आणि हुक्का पार्लर छुप्या पद्धतीने चालू आहेत. (पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याचे दुष्परिणाम ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. अनेक डान्सबारमध्ये मुलींना लपवण्यासाठी छुप्या खोल्या उभारण्यात आल्या आहेत. या छुप्या खोल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पालिका आयुक्तांना पत्र देत कारवाईची मागणी केली होती; मात्र २० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही पालिकेकडून या पत्राची नोंद घेतली गेली नाही. याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर कारवाई चालू केली आहे; मात्र पालिका आणि पोलिसांच्या असमन्वयाने शहरातील डान्सबार चालकांचे फावते आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात