होन्नावर (कर्नाटक) येथील हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त यांच्या हत्येचे प्रकरण
- काँग्रेसच्या राज्यातील पोलिसांकडून खोटा शवविच्छेदन अहवाल बनवण्यात आल्याचा आरोप
- जय श्रीराम लिहिलेल्या हाताची चामडी सोलली !
- डोक्यावर उकळते तेल ओतले !
- लिंग कापले !
- कोयत्याने डोक्यावर प्रहार केला !
- हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष आणि गुजरातमध्ये मंदिरांमध्ये जाऊन हिंदूंची मते मिळवू पहाणारे नेते याविषयी गप्प का ?
- गोरक्षकांकडून झालेल्या कथित हत्यांविषयी देशात असहिष्णुता वाढल्याचा ऊर बडवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लेखक, पत्रकार या घटनेविषयी अद्याप गप्प का ?
- कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हिंदूंची क्रूर हत्या करणार्या आणि त्यांना बाटवणार्या टिपू सुलतानची जयंती साजरी करून राज्यातील धर्मांधांना त्याचा आदर्श घेऊन कृती करण्याचा संदेश दिला आहे का ?
- गोरक्षण, लव्ह जिहाद यांमुळे हत्या होत असल्याची आवई उठवणारे निवृत्त सरन्यायाधीश लोढा यांच्यासारखे लोक आता कुठे आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
होन्नावर (कर्नाटक) : ६ डिसेंबर या दिवशी येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला होता. या दिवशी घडलेल्या घटनेची माहिती आता समोर येत आहे. त्यातून ५ धर्मांधांनी त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे यातून उघड झाले आहे. तसेच कर्नाटक पोलिसांनी ही माहिती समोर येऊ नये म्हणून त्याचा खोटा शवविच्छेदन अहवाल संबंधित डॉक्टरांना हाताशी धरून बनवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. भाजपने या हत्येची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करावी, अशी मागणी केली आहे; मात्र पोलिसांनी परेश याची हत्या झाली नसून त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी ६ डिसेंबरला झालेल्या दंगलीच्या प्रकरणी ३२ धर्मांधांना आणि ११ हिंदूंना अटक केली आहे.
परेश मेस्त यांच्या हत्येचा घटनाक्रम
१. ६ डिसेंबरला बाबरी मशिदीच्या पतनाच्या विरोधात धर्मांधांनी दगडफेक चालू केली होती. या वेळी परेश मेस्त यांनी स्वतःचा बचाव करतांना त्याच्या मुसलमान मित्राच्या हॉटेलमध्ये आसरा घेतला.
२. त्या वेळी ४ धर्मांध तरुण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी परेश यांना पकडून तेथून दुसर्या हॉटेलमध्ये नेले.
३. परेश यांच्या उजव्या हातावर जय श्रीराम गोंदलेले होते. धर्मांधांनी प्रथम जय श्रीराम लिहिलेल्या परेश यांच्या हाताची चामडी सोलून काढली.
४. त्यानंतर या हॉटेलमधील उकळते तेल त्यांच्या डोक्यावर ओतले.
५. त्यानंतर त्याचे लिंग कापले गेले.
६. मग शेवटी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करून हत्या केली.
पोलिसांकडून लपवाछपवीचा प्रयत्न होत असल्याचा संशय !
या हत्येमध्ये इम्तियाज, आझाद, आमीर, सलीम आणि आसिफ हे सहभागी झाले होते आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांपैकी तिघांना अटक केली आहे, असे वृत्त स्वराज्य वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे; मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. पोलीस याविषयी कोणतीही माहिती देण्याचे टाळत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपच्या खासदार शोभा करंदजले यांनीही परेश यांची हत्या नृशंसपणे केल्याचा आरोप केला आहे. या वृत्तात पोलिसांनी म्हटले आहे की, परेश यांच्यावर आम्ल किंवा अन्य कोणत्या पदार्थाद्वारे आक्रमण करून त्यांचा चेहरा विद्रुप करण्यात आलेला नाही, तर तलावात दोन दिवस राहिल्याने तो विद्रुप झाला आहे. तसेच त्यांच्यावर आघात झाल्याच्या कोणत्याही खुणा शरिरावर नसल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याचे सांगितले.
शिरसी (कर्नाटक) येथे परेश मेस्तच्या हत्येवरून बंद !
शिरसी येथे १२ डिसेंबरला हिंदुत्वनिष्ठांकडून बंद पाळण्यात आला. होन्नावर येथे झालेल्या दंगलीत परेश मेस्त या हिंदुत्वनिष्ठाच्या धर्मांधांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. या वेळी काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीमार केला. तसेच पोलिसांनी काही जणांना अटक केली. यात आमदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा समावेश आहे. ११ डिसेंबरला या हत्येच्या प्रकरणी कुमठा येथे आंदोलन करण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात