स्वत: गोवंश हत्या न रोखणारे आणि प्राणीप्रेमींनाही साहाय्य न करणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मडगाव : अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती; मात्र काही लोकांच्या दबावामुळे पोलिसांनी अली बेपारी आणि नाझिर बेपारी या कसायांना तात्काळ अटक करण्यास टाळाटाळ केली, तसेच घटनास्थळाजवळच असलेली गाभण गाय आणि वासरू यांची सुटका करणे टाळले. तसेच मागणी करूनही पुरेशी पोलीस सुरक्षा घटनास्थळी न पाठवता गोरक्षक सदस्यांना एकटे असुरक्षित सोडून देण्यात आले. त्यानंतर दुसर्या दिवशी अॅनिलम वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी तक्रार केल्यानंतरही कसायांच्या विरोधात केवळ नाममात्र गुन्हा नोंदवून घेण्यात आला, असा आरोप अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्या अंजली आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी पोलिसांच्या या अक्षम्य हलगर्जीपणाविषयी पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कसायांना अटक झाली नाही आणि गोवंशाचीही कसायांच्या तावडीतून सुटका झाली नाही. कामात हलगर्जीपणा करणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि अन्य पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी केली आहे.
अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी घातलेल्या छाप्याच्या वेळी घटनास्थळावरून नुकतीच हत्या करण्यात आलेल्या गोवंशाचे मांस, हातोडे, गळ, २ शितकपाटे आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. हे दोघेही कसाई चिंचीणी येथे मांसविक्रीचे दुकान अन्न आणि औषध प्रशासनाच्या कुठल्याही अनुज्ञप्तीशिवाय चालवत आहेत. सदस्यांनी तक्रार केल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक अर्चना गावकर, शिपाई संजय यांनी केवळ १ शिपाई घटनास्थळी पाठवला. प्रत्यक्षात अली बेपारी यांच्या घराजवळच चर्चच्या मागे एक गाभण गाय आणि वासरू बांधून ठेवण्यात आले होते. याविषयी माहिती असूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.
स्थानिक गुंडांकडून सदस्यांना धमकावण्याचा प्रकार
काही स्थानिक गुंड घटनास्थळी दुचाकीवरून आले आणि त्यांनी अॅनिलम वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांना धमकावण्यास आणि त्यांची झाडाझडती घेण्यास प्रारंभ केला. या वेळी सदस्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना संपर्क केला; मात्र त्यांच्याकडून कोणतेही साहाय्य मिळाले नाही. घटनास्थळी असलेले दोन पोलीस जी ए ०७ जी ३९० या वाहनात बसून सदस्यांना एकटे टाकून घटनास्थळावरून निघून गेले. (कुठलेही सरकार आले तरी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन ही आपल्या देशात रीतच होऊन बसली आहे. त्यामुळे पोलीस अल्पसंख्यांकांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हा एकमेव पर्याय आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात