Menu Close

ब्रिटनमध्ये युरोपीय तरुणींवर पाकवंशियांकडून लैंगिक अत्याचारांची शक्यता !

  • पाकवंशीय जगातील अन्य नागरिकांच्या तुलनेत सर्वाधिक गुन्हेगार आणि आतंकवादी असतात, असे कोणी म्हटल्यास चुकीचे ते काय ? पाकशी मैत्री करायला हवी, असे म्हणणारे याविषयी बोलतील का ?
  • ब्रिटनला जे लक्षात येते आणि ते जसे अभ्यास करतात, तसे भारतातील तज्ञ का अभ्यास करत नाहीत आणि वस्तूस्थिती का मांडत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

लंडन : ब्रिटनमध्ये पाकिस्तानी वंशाच्या लोकांकडून युरोपीय तरुणींना मद्य आणि अमली पदार्थ यांद्वारे गुंग करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होऊ शकतात, अशी माहिती या संदर्भात अभ्यास करणार्‍या तज्ञांच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

१. पाकवंशाचे लोक स्वत:च्या आशियाई वंशामुळे ब्रिटनमधील समाजाशी जवळीक  निर्माण करण्यास अयशस्वी होत असल्याने ते असे करू शकतात, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. यामुळे सरकारने पाकवंशाच्या लोकांनी आधुनिक ब्रिटीश समाजाशी जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे म्हटले आहे.

२. ब्रिटीश तज्ञांच्या ‘क्विलियम’ या गटाने वर्ष २००५ ते २०१७ या कालावधीत लैंगिक अत्याचारांच्या ५८ प्रकरणांचा अभ्यास केला. यात २६४ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. यातील २२२ म्हणजे ८८ टक्के लोक आशियायी वंशाचे आणि त्यातही पाकवंशाचे बहुसंख्य होते. केवळ २२ जणच अश्‍वेत (निग्रो) आणि १८ गोरे (युरोपीय वंशाचे) होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *