शत्रूदेशाने खरेदी केलेल्या युद्धसाहित्याचा वापर करण्यापूर्वी शत्रूदेशावर आक्रमण करण्याची बुद्धी भारतीय शासनाला सुचेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : पाकिस्तानने आतंकवाद्यांसाठी युद्धसामग्री खरेदी केल्याची घटना समोर आली आहे. त्याने चीनकडून भूमीवरून मारा करणारे २ सहस्र ४९६ लाँचर खरेदी केले आहेत. या लाँचरचा वापर पाकिस्तान सीमेवरून भारतात ग्रेनेड, रॉकेट सोडण्यासाठी करू शकतो. पाकने खरेदी केलेल्या शस्त्रांविषयी भारताने चिंता व्यक्त केली आहे. (नुसती चिंता व्यक्त करणारे नको, तर शत्रूच्या प्रत्येक कृतीला जशास तसे उत्तर देणारे सशक्त सरकार हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘आजतक’ वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
१. पाकने १५ ‘यूएव्ही’ ड्रोनही खरेदी केले आहेत. या ड्रोन्सला ‘चायनिज किलर ड्रोन’ही म्हटले जाते. या ड्रोनच्या साहाय्याने आतंकवादी कारवाया आणि भारतीय सुरक्षा यंत्रणा यांवर लक्ष ठेवण्याची योजना आहे. पाकने चीनकडून ‘सर्व्हिलान्स सिस्टम’ही खरेदी केली आहे.
२. नौदलासाठी ‘०५४ एपी फ्रिगेट’ युद्धनौकाही खरेदी केली आहे. या नौकेतून हवेतून भूमीवर मारा करणारे रॉकेटही सोडले जाऊ शकतात.
३. हाँगकाँगच्या एका आस्थापनाकडून सैनिकांसाठी उबदार कपडे खरेदी केले आहेत. पाकिस्तान हे उबदार कपडे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्या आतंकवाद्यांना देणार आहे, अशी माहितीही देण्यात येत आहे. या कपड्यांमुळे बर्फवृष्टी होत असतांना आतंकवाद्यांना घुसखोरी करता येणे शक्य होणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments