चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नईमध्ये हिंदुत्वनिष्ठांंसाठी १० डिसेंबर २०१७ या दिवशी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शिवसेना, भारत हिंदु मुन्नानी, अखिल भारत हिंदु महासभा, दक्षिण भारत हिंदु महासभा, श्रीराम युवा सेना, हिंदु महासभा ट्रस्ट, ऑल इंडिया टेम्पल वर्शीपर्स सोसायटी, हिंदु इलेनार येलुची पेरावई आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३२ प्रतिनिधी सहभागी झाले होते. शिवसेनेचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् यांनी या शिबिराच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्य समन्वयक पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सौ. कल्पना बालाजे आणि श्री. प्रभाकरन् यांनी अनुक्रमे साधना अन् नामजप यांचे महत्त्व सांगितले. श्री. जयकुमार यांनी सूक्ष्म-ज्ञानाच्या संदर्भातील प्रयोग करून दाखवला. सौ. सुधा गोपालकृष्णन् यांनी प्रार्थनेचे महत्त्व सांगितले.
दुपारच्या दुसर्या सत्रात सौ. सुगंधी जयकुमार यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व सांगितले, तर श्री. राधाकृष्णन् यांनी हिंदु ऐक्याचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनायक शानभाग यांनी केले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या वेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. हिंदुत्वनिष्ठ छायाचित्रकार श्री. मणिकंतन यांनी छायाचित्रे काढण्याची सेवा केली.
२. हिंदुत्वनिष्ठांकडून पुढच्या वेळी २ दिवसांचे शिबीर ठेवण्याची मागणी करण्यात आली, तसेच भविष्यात जिल्हास्तरावर किंवा ग्रामपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याची विनंती करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात